Actor Anuj Sachdeva instagram
मनोरंजन

Actor Anuj Sachdeva |‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अनुज सचदेवावर हल्ला! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Actor Anuj Sachdeva | ये रिश्ता क्या कहलाता है फेम अनुज सचदेवावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

टीव्ही अभिनेता अनुज सचदेव, जो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे प्रसिद्ध झाला, याच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

attack on Actor Anuj Sachdeva

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अनुज सचदेववर काठी हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात त्याने स्थान मिळवले होते. अनुज सचदेववर हल्ला झाल्याचा दावा असणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अनुज सचदेवाने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अनुजने सांगितले की, त्यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती अनुजला काठीने मारताना दिसत आहे आणि शिव्या देतना दिसतो. अनुजने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. अनुजने त्या व्यक्तीबद्दस सर्व माहिती शेअर केली आहे. अनुजने सांगितलं की, त्याच्या डोक्यातून रक्त निघत आहे.

नंतर दोन सुरक्षा रक्षकांनी येऊन त्याला पकडलं. यानंतर देखील ती व्यक्ती शिव्या देत राहिला. इतकेच नाही तर अनुजला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

अनुजने शेअर केला व्हिडिओ

अनुजने कॅप्शनमध्ये लिहिलं - ही व्यक्ती मला वा माझ्या प्रॉपर्टीला कुठलीही हानी पोहोचवण्याच्या आधी पुरावा म्हणून व्हिडिओ सर्वांना दाखवत आहे. त्या व्यक्तीने माझ्यावर कुत्रे सोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मला काठीने मारलं. कारण, मी सोसायटी ग्रुपमध्ये सांगितलं होतं की, त्या व्यक्तीची गाडी सोसायटी पार्किंगमध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क होती. मी त्या व्यक्तीचे डिटेल्स शेअर करत आहे. प्लीज त्या लोकांपर्यंत पोहोचवा, जे या विरोधात कारवाई करू शकतील. माझ्या डोक्यातून रक्त निघत आहे.

अनुजने या मालिकांमध्ये केलं आहे काम

अनुज लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने साजन घर जाना है, सपना बाबुल का बिदाई, सबकी लाडली बेबो, किस देश में है मेरा दिल, ससुराल गेंदा फूल, साथ निभाना साथिया, नच बलिए 9 में, मन की आवाज प्रतिज्ञा, फिर सुबह होगी, वो तो है अलबेला, ये रिश्ता क्या कहलाता है, ओटीटी वेब सीरीज 'छल कपट'मध्ये काम केलं आहे. या सीरीजमध्ये तो काम्या अहलावत सोबत भूमिकेच होता. या सीरीजमध्ये रागिनी द्विवेदी, श्रिया पिळगावकर, तुहिना दास यांच्याही भूमिका होत्या. याशिवाय, 'ध्रुव तारा-समय सदी से परे' मालिकेत मान सिंहच्या भूमिकेत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT