Abhishek Bachchan On trollers
मुंबई - अभिषेक बच्चन स्पष्ट बोलणारा अभिनेता आहेय यावेळीही त्याने ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. यंदाही त्याच्या आत्मसन्माला धक्का पोहोचल्याने त्यांने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिण्यात आलं की, अभिषेकने २०२४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट I Want to Talk साठी 'फिल्मफेयर बेस्ट ॲक्टर ॲवॉर्ड' जिंकलं नाही तर खरेदी केलं आहे. हा चित्रपट शूजित सरकारचा होता. फिल्मफेअर ॲवॉर्ड खरेदी करण्यावरून अभिषेक बच्चनवर टीकेची झोड उडाली. पण गप्प बसेल तो अभिषेक बच्चन कसला?
बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनवर एका सोश मीडिया युजरने कॉमेंट केली की ... ‘’मला हे सांगताना खेद होत आहे की, अभिषेकने आपल्या पेशाचा वापर करून या गोष्टीचे उदाहरण दिले आहे की, त्याने कशा प्रकारे पैसे देऊन पुरस्कार खरेदी केला आहे. सोबतच खराब पीआर करवूर स्वत:ला रेलेवेंट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुमच्या कारकिर्दीत एकही सोलो ब्लॉकबस्टर चित्रपट नसला तरी.
अभिषेकला यावर्षी "आय वॉन्ट टू टॉक" साठी पुरस्कार मिळाला, हा चित्रपट मोजक्याच सशुल्क समीक्षकांशिवाय कोणीही पाहिलेला नाही. आणि आता मला असे सर्व ट्विट दिसत आहेत ज्यात २०२५ हे त्याचे वर्ष असल्याचा दावा केला जात आहे. हे खूप मजेदार आहे. त्याच्यापेक्षा बरेच चांगले कलाकार आहेत जे अधिक ओळख, काम, प्रशंसा आणि पुरस्कारांना पात्र आहेत. पण दुर्दैवाने, त्यांच्याकडे जनसंपर्क जाणकार नाही किंवा पैसाही नाही.’’
अभिषेक बच्चनने नेहमीप्रमाणे शांत न बसता यावेळी थेट प्रतिक्रिया दिली. त्याने ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं, “जर मेहनतीचा सन्मान पुरस्कारात मोजला गेला असता, तर प्रत्येकजण विजेता असता. पण काही लोकांना इतरांचा यशस्वी क्षणही पचत नाही.” या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याचं वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं.
अभिषेकच्या चित्रपटाने I Want to Talk साठी त्याला फिल्मफेअर बेस्ट ॲक्टर ॲवॉर्ड मिळाला. बॉ्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. पण, चित्रपट समीक्षकांनी कौतुक केले होते.