

मुंबई - सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची FWICE ची मागणी असून तसे विनंती पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक पत्र लिहून भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील शाह यांच्या चार दशकांच्या अमूल्य कामगिरीवर प्रकाश टाकण्याची विनंती केली आहे.
FWICE ने अभिनेते सतिश शाह यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी पीएम मोदी यांना एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं, "फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज कडून आम्ही हात जोडून आणि मनापासून आवाहन करतो की, भारताचे लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते स्वर्गीय सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री देण्यासाठी विचार करण्यात यावा. "
FWICE ने पुढे लिहिलं की, "संपूर्ण वर्किंग कम्युनिटी त्यांचा खूप आदर करते आणि त्यांनी नेहमी FWICE सोबत मिळून अनेक चांगल्या कार्यात आपले समर्थन दिले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. जर त्यांना पद्मश्री ॲवॉर्डने सन्मानित केलं गेलं तर त्यांची कला, संस्कृती आणि अनेक वर्षांपर्यंत लोकांना ज्या पडद्यावर एंटरटेनमेंट केलं आहे, त्यासाठी एक श्रद्धांजली होईल. हा सन्मान त्या व्यक्तीसाठी खास ओळख होईल...''
सतीश शाह यांनी आपल्य़ा संपूर्ण चित्रपट करिअरमध्ये २५० हून अधिक फिचर चित्रपट केले होते. त्यांचा पहिला चित्रपट अरविंद देसाईंचा 'अजीब दास्तां' होता. सतीश शाह ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘ये जो है जिंदगी’, ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि ह्युमरमुळे ते प्रेक्षकांचे आवडते कलाकार ठरले.
सतीश शाह यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला होता. अभिनेता अनुपम खेर, परेश रावल, रत्ना पाठक शाह, सुहासिनी मुळे आदींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत त्यांच्या सन्मानाची मागणी केली होती.
अनुपमा फेम रुपाली गांगुली यांची खास विनंती
श्रद्धांजली सभेत उपस्थित मीडिया समोर रूपाली गांगुलीने हात जोडून विनंती केली की, सतीश शाह यांच्या पत्नी मधु शाह यांना कॅमेराबद्ध करू नये. मधु शाह, अल्जायमरने त्रस्त आहेत. रूपाली म्हणाली, 'कृपया कॅमेरे खाली कर, मधु काकींना कॅमेऱ्यात कैद करू नका. त्यांना जाऊ द्या, आम्ही सर्व इथे आहोत .'