Abhijeet Bhattacharya on Chunari-Chunari-Song-Remake
मुंबई - 'है जवानी तो इश्क होना है' या आगामी चित्रपटातील एका गाण्याची व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात वरुण धवन, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हिट चित्रपट 'बीवी नंबर १' मधील 'चुनरी चुनरी' या सुपरहिट गाण्याचा रिमेक नव्या चित्रपटात असणार आहे. आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये हे कलाकार चुनरी चुनरी गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
मुळात हे गाणे दिग्गज गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी गायले आहे. आणि त्यांनी ही क्लिप पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांना हे गाणे रिमेक केले जात असल्याचे सांगण्यात आले नव्हते. त्यांना ओजी गाणे आवडत नसल्याचे ते म्हणाले.
एका बातचीत मध्ये ते म्हणाले, त्यांनी कुणीच सूचना दिली नाही की, या गाण्याचा रिमेक येतोय. कुणाच्यात 'हिंमत' नाहीये. 'मला म्युझिक कंपोजर, दिग्दर्शक कुणीच सांगितले नाही क, या गाण्याचे रिमेक केले जात आहे. सांगायची हिंमत देखील करून शकत नाहीत.'
अनु मलिक यांनी चुनरी चुनरी गाण्याचे बोल लिहिले होते. गायक अभिजीत यांच्यासोबत अनुराधा श्रीराम यांनी गायलं होतं. सलमान खान - सुष्मिता सेन यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. 'बीवी नंबर १' चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केलं होतं. आणि आता 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तेच करत आहेत.
ते पुढे म्हणाले की, वैयक्तीकपणे माझ्या उत्तम गाण्यांच्या यादीत 'चुनरी चुनरी' हे गाणे कधीच नव्हते. निर्मात्यांना फक्त हे गाणं हिट करायचं होतं.नंतर मला अनुभव आला की, हे गाणे खूपच हिट झाले आहे. फॅन्ससाठी हे गाणे 'आयकॉनिक' ठरले. मागील २५ वर्षांमध्ये अनेक कार्यक्रम, पार्टीमध्ये हे गाणे वाजवले जाते. मी नेहमी हा विचार करायचो की, असे काय आहे या गाण्यात?