Trending Song Aaya Sher instagram
मनोरंजन

Trending Song Aaya Sher film The Paradise | तब्बल अडीच एकरांवर उभारला स्लम सेट, ‘आया शेर’ गाणं पाहायलाचं हवं! हटके मुव्ह्जची सोशल मीडियावर चर्चा

Trending Song Aaya Sher film The Paradise | तब्बल अडीच एकरांवर उभारला स्लम सेट, ‘आया शेर’ हे गाणं तर तुम्हाला पाहायलाचं हवं!

स्वालिया न. शिकलगार

‘द पॅराडाईज’ या चित्रपटातील ‘आया शेर’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्यासाठी तब्बल अडीच एकरांवर स्लमचा भव्य सेट उभारण्यात आला होता. गाण्याची ऊर्जा, भव्य सेट आणि दमदार कोरिओग्राफी यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आले असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

नवीन चित्रपट The Paradise सध्या चर्चेत आहे आणि त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे चित्रपटातील जबरदस्त गाणं आया शेर(Aaya Sher). हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हटके मुव्ह्ज दमदार संगीत, जबरदस्त बीट्स आणि भव्य सेटमुळे हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यासाठी उभारण्यात आलेला सेट. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या गाण्याच्या चित्रीकरणासाठी तब्बल अडीच एकरांवर स्लमचा भव्य सेट उभारला होता. सेट तयार करण्यासाठी अनेक दिवस मेहनत घेण्यात आली. स्लम एरियाचं वास्तवदर्शी चित्रण करण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्यात आले होते.

'आया शेर' हे यावर्षीच्या सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरले आहे. अनेक भाषांमध्ये या गाण्याने मिलियन्स व्ह्यूज मिळवले आहे. इन्स्टा रील्स पासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चे होतेय. निर्मात्यांनी एक भव्य ‘स्लम एम्पायर’चा सेट उभारला, ज्यामध्ये अभिनेत्याला स्लमचा सम्राट म्हणून दाखवण्यात आले आहे. ‘द पॅराडाईज’चा टीझर आधीच पसंतीस उतरला आहे. काही वेळातच मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळवल्यानंतर आता गाण्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होतेय.

‘द पॅराडाईज’मधील ‘आया शेर’ हे गाणे पाहायलाच हवे, असे आहे. अभिनेत्याचा डान्स, एकापेक्षा एक मुव्ह्ज, जबरदस्त एनर्जी आणि भव्य व्हिज्युअल्स पाहायला मिळताहेत. चित्रपटाच्या आर्ट डिपार्टमेंटने मेहनत घेऊन भव्य सेट उभारले आहेत. ‘हिरो हाऊस’ (कमांड सेट) - हा ६० फूट रुंद, ४५ फूट उंच आणि २५ फूट खोल असा विशाल स्ट्रक्चर आहे, हिरोच्या दमदार डिप सीनसाठी हा सेट तयार करण्यात आला होता. २५ कामगारांनी २० दिवसांच्या मेहनतीने हा भव्य स्ट्रक्चर उभारला.‘एजिंग’ (जुनं दिसण्यासाठी) तंत्राचा वापर करण्यात आला.

बिर्याणीच्या मोठ्या भांड्यासारखा स्ट्रक्चर- याला तांब्याचा (copper) फिनिश आणि जुना लुक देण्यात आला आहे. १० फूट रुंदी, २० फूट रेडियस आणि ६ फूट उंची असलेला हा सेट ७ जणांचा टीमने फक्त पाच दिवसांत तयार केला. २.५ एकरवर ‘वॉटर बॉडी व्हिलेज सेट’ उभारण्यात आला. यात डमी स्ट्रक्चर्सऐवजी ६० खरी घरे बांधण्यात आली होती. ५० कामगारांनी ३० दिवस मेहनत करून हे गाव उभारले. पाण्याचा सीन तयार करण्यासाठी १०० टँकर पाणी आणण्यात आले, जे भरायला सात दिवस लागले होते. पाणी साठवण्यासाठी २० फूट खोल असा वेगळा तलावही तयार करण्यात आला होता.

‘डंप यार्ड’ सेट १२० फूट लांब, ५० फूट रुंद आणि ३० फूट उंच उभारला. ‘आया शेर’ गाण्यात दिसणारे भव्य व्हिज्युअल्स हे या सेटमुळे भव्य दिसतात. हा चित्रपट २१ ऑगस्टला वर्ल्डवाईड रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT