Aamir Khan break silence on Ram Gopa Varma
मुंबई - दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा हिट चित्रपट रंगीला किती गाजला, हे सर्वश्रुत आहेच. या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. आता आमिर रंगीला दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सोबत असलेल्या नात्यावर स्पष्टच बोलल. दोघांमध्ये चित्रपट रंगीला नंतर वाद निर्माण झाला होता.
रंगीला १९९५ मध्ये रिलीज झाला होता. आमिर खान, उर्मिला मातोंडकर, जॅकी श्रॉफ यांच्या भूमका असलेला चित्रपट सुपरहिट ठरला होता. सुंदर गाणी, चित्रपटाची दमदार कहाणी आणि कलाकारांचा अभिनय सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. पण त्यावेळी असं काही घडलं की, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा - आमिर खान यांचे नाते बिघडले. दोघांचे नाते पुन्हा कधी चांगले झाले नाही. पुढे त्यांनी कधीच एकत्र चित्रपट केला नाही. आता आमिरने या नात्याबद्दल अखेर मौन सोडले आहे.
रेडिफवर बातचीत वेळी एका फॅनने आमिरला विचारलं की, "राम गोपाल वर्मा आणि तुझयात काय बिनसल? तो एक शानदार दिग्दर्शक आहे आणि त्यांची मैत्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरली असती!" यावर आमिर म्हणाला, "राम गोपाल वर्मा आणि माझ्यामध्ये कधी चांगली मैत्री कधी नव्हती आणि मला विश्वास आहे की, मी त्याला एक दिग्दर्शक म्हणून आठवणीत ठेवेन."
या संपूर्ण वादाची सुरुवात रंगीलामधील एका सीनवरून झाली होती. राम गोपाल वर्माने म्हटलं होतं की, त्या सीनमध्ये वेटरची भूमिका साकारलेल्या कलाकाराने आमिर खान पेक्षा चांगला अभिनय केला होता. मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने ही माहिती समोर आळी आणि अस वाटले की, वर्माने आमिरच्या अभिनयावर टीका केलीय.
या कॉमेंटनंतर आमिरला वाईट वाटले आणि नंतर राम गोपाल वर्माने स्पष्टीकरण दिलं की, त्याचं वक्तव्य एक तांत्रिक दृष्टीकोणातून होतं. त्याचा उद्देश आमिरच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं नव्हते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आमिर खान त्याचा 'सितारे जमींन पर' चित्रपट घेऊन येत आहे. त्याचा निर्माताही आमिर स्वतः आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरुस प्रसन्ना यांनी केले आहे. नवीन कलाकारांसह हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.