पुढारी ऑनलाईन: अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीला सध्या स्वतंत्र ओळखीची गरज नाही. खूप काळ संघर्ष केल्यानंतर आता तो बॉलीवूडमध्ये सेट झाला आहे. नुकतेच नवाझने त्याचे मुंबईत ड्रीम हाऊस बांधले आहे. या घराला त्याने वडिलांचे 'नवाब' हे नाव दिले आहे. ( मन्नत )
या घराचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या घराचे इंटेरिअरदेखील स्वतः नवाझनेच केले आहे. या घराच्या नूतनीकरणासाठी तब्बल 3 वर्षे लागली आहेत; पण आता घराच्या फोटोवरून त्याची तुलना थेट शाहरूख खानच्या 'मन्नत' या घराशी होत आहे. या घराला नवाझने थोडासा त्याच्या गावाकडील घराचाही लूक दिला आहे. घराचे एक्स्टेरियर पूर्ण पांढर्या रंगाचे आहे.
दरम्यान, नवाझच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर 2022 हे वर्ष त्याच्यासाठी खूप व्यग्र असणार आहे. त्याचे पाच ते सहा चित्रपट या वर्षात येऊ शकतात. त्यापैकी काही पूर्ण झाले आहेत, तर काहींचे शूटिंग सुरू आहे. 'टिकू वेडस् शेरू', 'हीरोपंती 2' याशिवाय अवनित कौरसोबतच्या एका चित्रपटात नवाझ दिसणार आहे.
हेही वाचलंत का?