Sonakshi Sinha Troll  
Latest

Sonakshi Sinha Troll : सोनाक्षी सिन्हा तोकड्या कपड्यामुळे ट्रोल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या आणि बॉयफ्रेंड झहीर इक्‍बाल याच्याबराेबर असलेल्‍या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोनाक्षी तिच्या तोकड्या कपड्यामुळे पुन्हा चर्चेत येवून ट्रोल
( Sonakshi Sinha Troll ) झाली आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) एक तासापूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर रंगीबेरंगी शर्ट आणि हाफ पॅन्ट वेशभूषेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनाक्षीने चित्रात स्वत:ची पेंटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तिच्या आजूबाजूलादेखील वेगवेगळे रंग दिसत आहेत. यातील खास म्हणजे, सोनालीने घातलेला शर्ट आणि आजूबाजूचे रंग एकसारखेच दिसतात.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ही एक खरी आणि अनोखी कलाकृती असल्याचे म्हटलं आहे. सोनाक्षीने शर्टवर एक बेल्ट परिधान केला असून फोटोला हॉट पोझ दिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही नेटकऱ्याच्या पसंतीस उतरले. तर काही नेटकऱ्याना अजिबात अवडले नाहीत.

या फोटोला कॉमेन्टस देताना काही नेटकऱ्यांनी 'सोनाक्षीने बालपणीचा ड्रेस घातला आहे काय?', 'शॉर्ट ड्रेसमुळे पाय उघडे दिसतात' आणि 'पाय दाखवण्यासाठी फाेटो काढला काय?' असे म्हणत जोरदार ट्रोल Sonakshi Sinha Troll ) केले आहे. याशिवाय तिने आणखी एका ब्लॅक रंगाच्या कटसाईट वनपिसमध्ये फोटोशूट केले आहे. यात केसांच्या पोनी स्टाईल, मेकअपने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. सोनाक्षीच्या इन्स्टाग्राम तिचे नवनवीन हॉट फोटो पाहायला मिळतात. या फोटोवर आतापर्यत्न २० हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती 'ककुडा' आणि 'डबल एक्सएल' चित्रपटात दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसली होती. गेल्या काही दिवसात बॉयफ्रेंड जहीर इकबाल याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT