file photo  
Latest

सोलापूर : सासर्‍याचा अंत्‍यविधी उरकून घराकडे निघालेल्‍या २ सुनांना ट्रकने चिरडले

निलेश पोतदार

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा सासऱ्याचा अंत्यविधी उरकून घराकडे परत निघालेल्या शोकाकुल महिलांच्या जमावात भरधाव वेगाने आलेला ट्रक घुसल्याने अपघात घडला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 महिला जखमी झाल्या. ही घटना काल (शुक्रवार) रात्री 11 वाजता पंढरपूर जवळील टाकली गुरसाळे येथे घडली आहे. विशेष म्हणजे ठार झालेल्या महिला अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्तीच्या सुना आहेत.

टाकळी गुरसाळे ता.पंढरपूर येथील गेनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी ७ वाजता निधन झाले होते. त्‍यांच्यावर रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल महिला पंढरपूर – वेनेगाव रोडच्या बाजूने घराकडे परतत होत्‍या. यावेळी करकंब कडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक महिलांच्या घोळक्यामध्ये घुसला.

या भीषण अपघातात मृत गुटाळ यांच्या दोन सुना हिराबाई भारत गुटाळ (वय 35 वर्षे) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40 वर्षे) या ठार झाल्या. तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या. गुरसाळे येथे टाकळी जवळ पंढरपूर-वेणेगाव रस्यावर (शुक्रवार) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT