Latest

Asia Cup SL vs BAN : श्रीलंकेचे बांगलादेशसमोर २५८ धावांचे आव्हान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सदिराच्या दमदार ९३ धावांच्या खेळीने आशिया चषक स्‍पर्धेतील सुपर ४ मध्ये श्रीलंकेने बांगलादेशसमोर २५८ धावांचे आव्हान उभे केले आहे. सुपर फोर मधील दुसरा सामना आज (दि.९) श्रीलंका आणि बांगलादेशमध्‍ये सुरु आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने ५० षटकानंतर  ९ गडी गमावत २५७ धावा केल्या.

श्रीलंकेकडून, पथुम निसंका ६० चेंडूमध्ये ४०, कुसल मेंडिस ७३ चेंडूमध्ये ५०, सदिराने ७२ चेंडूमध्ये ९३ तर दसुन शनाकाने ३२ चेंडूमध्ये २४ धावांची खेळी केली. सदिराच्या आक्रमक खेळीच्या जोरावर श्रीलंकेला २५० धावांचा टप्पा पार केला. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि हसन महमुदने प्रत्येकी ३ तर शोरुफल इस्लामने २ विकेट्स पटकावल्या.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT