Latest

Sikandar Raza : सिकंदर रझाची झंझावाती खेळी

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिकंदर रझाच्या अष्टपैलू झंझावाती खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने नेदरलँडवर 6 विकेटस्नी विजय मिळवला. नवख्या नेदरलँडस्ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 315 धावांचा डोंगर उभारला. सामना एकतर्फी होईल असे सर्वांना वाटत असतानाच झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने अष्टपैलू खेळी करून नेदरलँडस्च्या तोंडचा घास पळवला. सिकंदरने 4 बळी आणि शतकी खेळी करून सामना आपल्या नावावर केला. (Sikandar Raza)

झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून नेदरलँडस्ला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सांघिक खेळीच्या जोरावर नेदरलँडस्ने 315 धावा केल्या. नेदरलँडस्कडून विक्रमजीत सिंग (88), मॅक्स ओ दाऊद (59) आणि स्कॉट एडवर्ड्स (83) यांनी चांगली खेळी केली. तर झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 4 बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला 315 धावांपर्यंत रोखले. 316 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची शानदार सुरुवात झाली; पण संघाला 80 धावांवर संघाला पहिला झटका बसला. आघाडीच्या फलंदाजांनी सावध खेळी करून विजयाकडे कूच केली; पण नेदरलँडस्च्या गोलंदाजांनी देखील आक्रमक मारा करून झिम्बाब्वेला धक्के दिले. मात्र, सिंकदर रझा प्रतिस्पर्धी संघासाठी काळ ठरला. त्याने 54 चेंडूत 102 धावांची ऐतिहासिक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या शतकासह रझाने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने शतक ठोकणारा फलंदाज सिकंदर रझा ठरला. त्याने केवळ 54 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT