पुढारी ऑनलाईन डेस्क : Shweta Shinde : 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या डॉलीबाई यांनी लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'डॉक्टर डॉन' फेम डॉलीबाई अभिनेत्री श्वेता शिंदेने आपल्या दर्जेदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
श्वेता शिंदे हिने आज ब्रायडल थीम करून मराठमोळा लूक केला आहे. तिने पोपटी कलरची साडी परिधान केली आहे. यावर तिने सिलव्हर डिझाईन केलेले लाल रंगाचे ब्लाउज घातले आहे.
साजशृंगारातील श्वेताने चार चाँद लावले आहेत. तिच्या ब्रायडल लूकमध्ये चंद्रकोर आणि नथीने आणखी भर घातली आहे. या पेहरावातील हटके पोझमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेेंट्स केल्या आहेत. तिचा एक चाहता तिला म्हणत आहे, 'डॉलीबाई तुम्ही अजूनही १ नंबरच दिसता', 'अप्रतिम', 'ग्लॅमरस', 'हॉट', 'किती गोड दिसत आहेस श्वेता, खरंच काय नखरा केला आहेस, गालावरची खळी अजून त्यात भर घालत आहे. खरंच नवरात्र स्पेशल नजराणा आहे', 'खूप छान, खूप मस्त' अशा कमेंट तिच्या फोटोंवर येत आहेत.
श्वेता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव असते. ती नेहमी फोटोशूट करुन आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणार्या असतात. नूकतेच तिने ब्लॅक साडीत फोटोशुट केले होते. ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होतेे.
श्वेता एक अभिनेत्री आहेच त्याचबरोबर यशस्वी निर्मातीही आहे.
'श्वेताने वादळवाट', 'अवंतिका', 'डॉक्टर डॉन' यासारख्या मराठी मालिंकामधुन तिने दमदारपणे अभिनय केला आहे.