Latest

Shubman Gill IPL 2023 : “…तर खेळ त्याला चोख प्रत्युत्तर देईल”; शुभमन गिलच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी

मोहन कारंडे

[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहालीमध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने (Shubman Gill) टीममध्ये सर्वाधिक धावा केल्या. या सामन्यात गुजरातने पंजाबचा ६ गडी राखून पराभव केला. पण माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने गिलच्या या सामन्यातील खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. गिलने अर्धशतक केल्यानंतरच फलंदाजीचा वेग बदलला, त्याच्या या खेळीला सेहवागने स्वार्थी दृष्टिकोन म्हणत "संघाच्या हितापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार करू लागता, तेव्हा हा खेळ तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल," असे म्हटले आहे.

एका वृत्तवाहीनीशी बोलताना सेहवागने गिलला (Shubman Gill) संघाच्या हितापेक्षा स्वतःची महत्त्वाकांक्षा ठेवल्याबद्दल इशारा दिला आहे. या वृत्तीमुळे गुजरात सामनाही गमावू शकला असता, असे सेहवागने म्हटले आहे. गिलने ४९ चेंडूत ६७ धावा केल्या, पण त्याने पन्नाशी कधी गाठली? त्याने अर्धशतकासाठी ४१-४२ चेंडू खेळले आणि त्यानंतर ७-८ चेंडूत आणखी १७ धावा केल्या. गिलने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर खेळाचा वेग वाढवला. तसे झाले नसते तर गुजरात सात चेंडूत किंवा शेवटच्या षटकात १७ धावांचे आव्हान उभे केले असते. संघहिताच्या आधी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला प्राधान्य दिल्यास त्याचा मोठा फटका आपल्याला सहन करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, तुम्ही असे म्हणू शकत नाही की, मला पहिल्यांदा अर्धशतकाचा विचार करू द्या आणि मग आम्ही सामना जिंकू. हे क्रिकेट आहे. जेव्हा तुम्ही संघाच्या हितापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार करू लागता, तेव्हा हा खेळ तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल. तुम्ही असा विचार करू शकत नाही. गिलने अर्धशतकानंतरचा दृष्टीकोन आधी स्वीकारला असता आणि सुमारे २०० च्या स्ट्राइक-रेटने फलंदाजी केली असती तर तो खूप आधी पन्नास धावा करू शकला असता, असे सेहवागने म्हटले आहे. दरम्यान, सामना संपल्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने फलंदाजांनी डावाच्या मधल्या षटकांमध्ये जलद गतीने धावा केल्या पाहिजेत, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT