

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॅरी ब्रुकची शतकी खेळी, मयांक मार्कंडेच्या फिरकीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने कोलकाता नाईट राईडर्सचा २३ धावांनी पराभव केला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात आला होता. केकेआरचा कर्णधार नितेश राणा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादच्या संघाकडून हॅरी ब्रुक ५५ धावांमध्ये शतकी खेळी केली. तर अॅडम मार्करमनेही अर्धशतक झळकावले आणि केकेआरसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले.
दरम्यान, हैदराबादचा आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला २०५ धावाच करत्या आल्या. केकेआरकडून नितेश राणा आणि रिंकू सिंगने कडवी झुंज दिली. नितेश राणाने ४१ चेंडूमध्ये ७५ तर रिंकू सिंगने ३१ चेंडूमध्ये ५८ धावा केल्या. हैदराबादकडून मार्को जेन्सनने आणि मयांक मार्कंडेन प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. तर भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिकने प्रत्येकी १ विकेट पटकावली.