Latest

Shraddha Aftab Case : आफताबने श्रद्धाच्‍या मृतदेहाचे ३५ तुकडे ठेवलेला फ्रीज साकेत कोर्टात सादर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशाला हादरवून सोडणार्‍या श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरणाची सुनाणवी आज ( दि.५ ) दिल्‍लीतील साकेत न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी गुन्‍ह्यात वापरलेला फ्रीज साकेत न्‍यायालयात सादर करण्‍यात आला. या फ्रीजमध्‍ये आफताब याने श्रद्धाचा मृतदेहाचे ३५ तुकडे काळ्या पॉलिथिनमध्‍ये भरुन ठेवले होते।. नोव्हेंबर 2022 मध्ये श्रद्धा वालकर प्रकरण उघडकीस आले होते.
श्रद्धाच्या वडिलांचा जबाब नोंदवला. ( Shraddha Aftab Case )

साकेत न्यायालयात श्रध्दा हत्याकांडात तिच्या वडिलांचा जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यात आला. यासोबतच आफताबचे वकील श्रद्धाचे वडील आणि भावाचीही उलटतपासणी घेणार आहे. साकेत न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान घटनेत वापरलेले फ्रीज सादर करण्यात आला. या रेफ्रिजरेटरमध्ये आफताबने श्रद्धाचा मृतदेह तुकडे काळ्या पॉलिथिनमध्ये भरून ठेवले होते.

Shraddha Aftab Case : श्रद्धाच्या वडिलांनी फ्रीज आणि लाकडाचे तुकडे ओळखले

यासोबतच फॉरेन्सिक टीमने जप्त केलेले रक्ताने माखलेले प्लायवूडचे दोन तुकडेही न्यायालयासमोर दाखल करण्‍यात आले. श्रद्धाच्या वडिलांनी फ्रीज आणि लाकडाचे तुकडे ओळखले. त्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी हे पुरावे सील केले आहेत.तपासादरम्यान, आफताबच्या मागावर सापडलेल्या श्रद्धाच्या मृतदेहातील १३ हाडे सापडल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT