पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्बियाची राजधानी बेलग्रेडच्या दक्षिणेस सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्बियन शहराजवळ शुक्रवारी (दि.५) गोळीबार झाला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनूसार या गोळीबारात आठ जण ठार आणि दहा जखमी झाले आहेत. हल्लेखोराने चालत्या वाहनातून स्वयंचलित शस्त्राने गोळीबार केला आहे. हल्लेखोर गोळाबार नंतर पसार झाले आहेत. पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत, असे वृत्त एएफपी न्यूज एजन्सीने दिले आहे. (Shooting in Serbia)
दोन दिवसांत सर्बियामध्ये अशा प्रकारची दुसरी सामूहिक हत्या आहे. राजधानी बेलग्रेडमधील एका शाळेत १३ वर्षांच्या मुलाने वर्गमित्रांवर गोळीबार केल्याच्या घटनेने देश हादरलेला. त्याच्या एका दिवसानंतर आणखी एक घटना घडले आहे. त्या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकासह आठ मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्बियामध्ये बंदुकीबाबतचे नियम अतिशय कडक आहेत. यानंतरही सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी एका शाळेतही गोळीबार झाला होता. या घटनेतून लोक अजूनही सावरलेले नाहीत. हल्ल्यामागचे खरे कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा