prem pratha dhumshan  
Latest

Shivali Parab : “काय उमगेना” गाण्यात शिवलीचा लीपलॉकिंग सीन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंधुदुर्गातली गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा मांडणाऱ्या प्रेमप्रथा धूमशान या चित्रपटात अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटातलं "काय उमगेना" हे नवं गाणं लाँच करण्यात आलं आहे. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. या गाण्यात शिवालीनं लीपलॉकिंग सीन्समधून आपला बोल्डनेस दाखवला आहे. (Shivali Parab)

ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेमप्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे.

प्रेमप्रथा धूमशान चित्रपटातलं "धुमशान घाला रे" हे मालवणी गाणं आधीच सगळीकडे वाजत आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, थरारक प्रेमकथा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गावपळण या गूढ प्रथेची पार्श्वभूमी असा मसाला असलेला प्रेमप्रथा धूमशान हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवणार हे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT