मुंबई ; पुढारी ऑनलाईन : उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिंदे गटातील नेत्यांमध्ये शिवसैनिक उरला नाही. अन् गट वगैरे काही नाही ही तर टोळी आहे. मुंबईमध्ये खंडण्या गोळा करून परदेशात पसार होणाऱ्या जशा अंडरवर्ल्डच्या टोळ्या असतात तशा या टोळ्या आहेत. त्यांच स्व:ताच काही अस्तित्व नाही. त्यामुळे त्या नष्ट होतात, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.
महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे दुसरा कोणता गट म्हणत असेल की, आमची शिवसेना खरी आहे तर त्याला अर्थ नाही. शिंदे गटातील नेत्यांमध्ये शिवसैनिकच उरला नाही म्हणत त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.
आम्ही हिंदुत्ववादी आहोत
आम्ही हिंदु आहोत. हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या धर्माचा अनादर नव्हे म्हणत त्यांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपने मुळ मुद्यांना बगल देऊ नये. भाजपने राज्यपालांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावर पहिले बोलावे अशी मागणी केली. राज्यपालांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्याला भाजपचे समर्थन आहे का? असा प्रश्नही विचारला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. शिवरायांच्या अपमानाचा विषय असा मध्येच सोडता येणार नाही. त्यामुळे राज्यपालांना हटवण्याच्या मागणीवर प्रथम बोलावे असे ते म्हणाले.
भाजपमुळेच महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली
भाजपवर टीका करताना राऊत यांनी भाजपने गुजरात निवडणुकीसाठी महाराष्टातील उद्योग पळवले. त्यामुळे महाराष्ट्रात वाढलेल्या बेरोजगारीला सर्वस्वी भाजप जबाबदार असल्याची टीका राऊत यांनी केली.
हेही वाचा :