Latest

Kangana Ranaut Vs Krupal Tumane : “कंगनाला कोणाचे तळवे चाटून पुरस्कार मिळाला, सर्वांना माहीत आहे”

backup backup

बाॅलिवुड अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut Vs Krupal Tumane) दिवसेंदिवत वादग्रस्त वक्तव्य करतेच आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात आणि इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्तींकडूनही टीकेचा भडिमार होत आहे. तिने पुन्हा महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हणाली की, "गांधींनी कधीही नेताजी बोस, भगत सिंग यांना पाठिंबा दिला नाही. कानाखाली खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही", असं विधान आणि पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. त्यावर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

"महात्मा गांधीना सत्तेची लालसा होती, असं कंगनाने विधान केलं होतं. पण, त्यांना सत्तेची लालसा असती तर महात्मा गाधी पंतप्रधान, राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते. कंगनाला कशामुळे पद्मश्री मिळाला, कोणाचे तळवे चाटून पुरस्कार मिळाला ते दिल्लीतील खासदारांना आणि आमदारांना माहीत आहे", असंही वादग्रस्त वक्तव्य खासदार कृपाल तुमाने (Kangana Ranaut Vs Krupal Tumane) यांनी केलं आहे.

महात्मा गांधींबद्दल कंगना काय म्हणाली होती…

कंगनानं इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले होते. यामध्ये कंगनानं आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली आहे. पहिल्या मेसेजमध्ये कंगना म्हणते की, "ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते, ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचं रक्तही उसळलं नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असं स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा", असं कंगनानं म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीजवर दुसऱ्या मेसेजमध्ये कंगना म्हणते की, "गांधींनी कधीही भगत सिंग किंवा नेताजींना समर्थन दिलं नाही. भगत सिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरं तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचं आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे", असं म्हणत कंगणाने महात्मा गांधींवर निशाणा साधला होता.

हे वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT