Latest

Maharashtra Political Crisis Live : महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…?

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर काल (दि.२१) शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड करून ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. आज (दि.२२) रोजी हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला दाखल झाले आहेत. गुवाहाटी विमानतळाबाहेरून खास तीन बसेसने आमदारांना रॅडिसन हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार संघटनेचे बच्चू कडूही असून या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थन पत्रावर साह्य केल्या आहेत.

४० आमदारांना घेऊन रात्री उशिरा विशेष विमान सुरतवरून गुवाहाटीला निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मोहित कंभोज होते. ते पहाटे ६:३० वाजता गुवाहाटी विमानतळावर पोहचले असून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिंदेसह आमदारांचा मुक्काम हॉटेल रॅडिसनवर आहे.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या सोबत ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis Live अपडेट :

  • थोड्याच वेळात सरकारच्या भवितव्याचा फैसला
    शिवसेनेत माजलेला बंडाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ३५ पेक्षा जास्त आमदार असून ते परतले नाही तर सरकारच अल्पमतात येणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री सरकार बरखास्तीची शिफारसही करू शकतात. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांची गोळाबेरीज केली आहे. मात्र, ५५ पैकी सुमारे ३५ आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अल्पमतात असलेले सरकार कोणत्या क्षणी पडू शकते. त्यामुळे त्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
  • संजय राऊत खुश! कारण शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.  असे व्टिट नारायण राणे यांनी केले आहे. 
  • मी जे व्टिट केले आहे ते चूकीचे नाही. भाजपच्या मदतीशिवाय आमदारांचे अपहरण अशक्‍य आहे. तसेच शिवसेना अनेक अग्‍निपरिक्षा देईल. आणि बाळासाहेबांच्या स्‍मारकावर शपथ घेण्या-यांची ही अग्‍निपरिक्षा असेल. आमदार परत येतील असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास आहे, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्‍हणाले. 
  • गुलाबराव पाटील गुवाहाटीला रवाना झाल्‍याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात आली आहे. यामूळे आता एकनाथ शिंदे यांच्या ते गटात सामिल होणार का? 
  • माझा सोबत एकूण ४६ आमदार आहेत. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून बोलने झाले आहे. असे एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्‍हणाले.
  • महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन आमदार परत आले आहेत. कैलास पाटील आणि नितीन देशमूख हे दोन आमदार परत आले आहेत.
  • मी शिवसैनिक आहे. मला २० ते २५ २५ जणांनी मला इजेक्‍शन दिले. ते कोणते होते, काय होते हे मला माहिती नाही. आमचे मंत्री होते म्‍हणून मी त्‍याच्यासोबत गेलो होतो असे नितीन देशमूख यांनी मोठे व्यक्‍तव्य केले आहे.
  • एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आज  मुंबई येथे राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
  • एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार परत येतील. जे बाहेर आहेत ते शिवसैनिक आहेत; त्यांना शिवसेनेसोबतच रहायचंय- संजय राऊत
  • राज्यपालांना बरं वाटू द्या. मग संख्याबळाचं बघू- संजय राऊत
  • आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंशी बोलणं झालं आहे. ते एक शिवसैनिक आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात सद्भभावना आहेत. जे बाहेर आहेत ते सर्व शिवसैनिक आहेत त्यांना शिवसेनेसोबतच रहायचे आहे. भाजपला वाटत असेल पत्त्याच्या बंगाल्याप्रमाणे कोसळले. राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद- संजय राऊत
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईत शरद पवारांच्या भेटीला
  • कमलनाथ आणि काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता.  
  • महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.. संजय राऊत यांनी  खळबळजनक व्टिट  केले आहे.   
  • काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघडीच्या पाठीशी आहेत. तसेच आम्‍ही सर्व काँग्रेस आमदाराच्या सपंर्कात आहोत – बाळासाहेब थोरात 
  • मुख्यमंत्री यांच्या उपस्‍थितीत राज्‍य मंत्रीमंडळाची पहिली बैठक १ सुरू होणार आहे. निवडणूक आणि शिंदे यांच्या बंडानंतर ही बैठक आहे.   
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली – काँग्रेस नेत्‍यांनी दिली याबाबत माहिती. 

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT