Share Market Today : अमेरिका, आशियाई बाजारातील घसरणीचे पडसाद आज बुधवारी (दि.२८) भारतीय शेअर बाजारात उमटले. या कमकुवत जागतिक संकेतांमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे १४० हून अंकांनी घसरून ६०,८०० वर तर निफ्टी १८ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीतून सावरत स्थिर पातळीवर आले.
डॉलर मजबूत राहिला आहे. तर आशियाई शेअर बाजारात घसरण पहायला मिळत आहे. कोरोना निर्बंधातून बाहेर पडून चीनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल याकडे आशियातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे गुंतवणूदारांनी सावध भूमिका घेतली आहे. याचा परिणाम आशियाई शेअर्सवर दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई निर्देशांक आज ०.५ टक्क्यांनी घसरला. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ०.५ टक्क्यांनी खाली येऊन १८,०५५ वर आला होता.
दरम्यान, रात्रभर अमेरिकेतील दोन निर्देशांक नॅस्डॅक कंपोझिट आणि S&P ५०० घसरणीसह बंद झाले. या निर्देशांकात अनुक्रमे १.३८ टक्क्यांनी आणि ०.४ टक्क्यांनी घसरण झाली. तर डाऊ जोन्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली. अमेरिकेतील बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात नकारात्मक वातावरण आहे. चीनच्या शांघाय कंपोझिट आणि शेन्झेन निर्देशांकात घसरण दिसून आली. दक्षिण कोरियाचा KOSPI निर्देशांक १.९७ टक्क्यांनी खाली आला. (Share Market Today)
हे ही वाचा :