Latest

Share Market opening | सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला, अदानी पॉवर तेजीत

दीपक दि. भांदिगरे

Share Market opening : शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी (दि.२१) तेजीत सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून ६०,८०० वर होता. तर निफ्टी १८ हजारांखालीच व्यवहार करत आहे. सुरुवातीला येस बँक (०.३० टक्के), अदानी पॉवर (३.२२ टक्के), पंजाब नॅशनल बँक (०.४० टक्के), टाटा स्टील (१.१६ टक्के), भारत इलेक्ट्रॉनिक्स (०.२१ टक्के), एनटीपीसी (१.७३ टक्के), अंबुजा सिमेंट (०.७७ टक्के) या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

काल सोमवारी सेन्सेक्स ३११ अंकांच्या घसरणीसह ६०,६९१ वर बंद झाला होता. तर निफ्टी ९९ अंकांनी खाली येऊन १७,८४४ वर स्थिरावला होता. आज दोन्ही निर्देशांकांनी तेजीत सुरुवात केली आहे. (Share Market opening)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT