पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवड्याचा पहिलाच दिवस शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी निराशजनक ठरला. निफ्टी १७३९० अंकांवर वर तर सन्सेक्स ५९,१५१ इतक्या अंकावर बंद झाला. आयसीसीआय, पॉवर ग्रीड, कोटक बँक, एचडीएफसी लाईफ आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी चांगली कामगिरी नोंदवली. तर बजाज अॅटो, अदानी एंटरप्राईजेस, इन्फोसिस, टाटा स्टील, यूपीएल कंपन्यांच्या समभागांनी खराब कामगिरी नोंदवली.
त्यानंतर सकाळच्या सत्रातच निफ्टीचा ऑटो इंडेक्स जवळपास १ टक्केंनी खाली आला तर बीएसईचा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इंडेक्सही १ टक्केंनी खाली घसरला होता. शिवाय बीएसई मेटल इंडेक्सची सुरुवातही खराब झाली. निफ्टी ऑटो इंडेक्स घसरल्याचा फटका बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर आणि अशोक लेलँड यांना बसला.
निफ्टी बँक इंडेक्स सोमवारी वधारला. हा इंडेक्स ४०,३०७ इतक्या अंकावर बंद झाला. बँक ऑफ बडोदा, कोटक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय यांचे शेअर्स सोमवारी वधारले. बंधन बँक, एयू बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, आणि एचडीएफसी बँक वगळता निफ्टी बँक इंडेक्समधील सर्वच समभागांनी सोमवारी गुंतवणूकदारांचा चांगला फायदा करून दिला.
अदानी पोर्टस लिमिटेडच्या शेअर्सनी सोमवारी चांगली कामगिरी केली. अदानी पोर्टसने ३० कोटी टन इतकी कार्गो हँडलिंग केल्याचे जाहीर केल्याने हा शेअर २.३२ टक्केंनी वधारला.
बजाज ऑटोच्या निर्यातीवर भर देणाऱ्या कारखान्यांतून होणारे उत्पादन २५ टक्केंनी कमी केल्याचे वृत्त आल्यानंतर बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. नायजेरिया ही बजाजसाठी मोठी बाजारपेठ आहे. सध्या या देशात राजकीय अस्थिरता असल्याने बजाजला याचा फटका बसू शकतो. सकाळच्या सत्रात बजाज ऑटोचा शेअर ३.५ टक्केंनी खाली आला होता.
आयसीसीआय, पॉवर ग्रीड, कोटक बँक, एचडीएफसी लाईफ आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्यांचे शेअर्स आज वधारले
तर बजाज अॅटो, अदानी एंटरप्राईजेस, इन्फोसिस, टाटा स्टील, यूपीएल या शेअर्सनी आज गुंतवणुकदारांची निराशा केली.
बाजारातील अस्थिर स्थिती लक्षात घेत फॅबइंडिया कंपनीने आयपीओ मागे घेण्याची घोषणा केली. तर पिरामल एंटरप्राईजेसने ६०० कोटींच्या भांडवलाची उभारणी करण्याची घोषणा केली.
हेही वाचा