Latest

Stock Market : सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह शेअर बाजार बंद, ‘या’ शेअर्समध्‍ये घसरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमध्‍ये कोरोनाचा वाढता पार्दुभाव संदिग्ध वातावरणामुळे  बुधवारी ( दि. २१) भारतीय शेअर बाजाराची घसरण झाली होती. त्यातून सावरून आज ( दि. १६ ) भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली होती. मात्र व्यवहार संपताना सेन्सेक्स २२८अंकांनी घसरून ६०८२६ वर बंद झाला, तर निफ्टी ७३ अंकांनी घसरून १८१२७वर बंद झाला.

आज सकाळच्‍या सत्रात तेजी दिसून आली आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी सेनेक्स १९०अंकांच्या तेजीसह ६१२५७अंकांवर तर निफ्टी ९० अंकांच्या तेजीसह १८२८८ अंकांवर गेला. तर बँक निफ्टी २४६ अंकांवरून तेजीसह ४२८६५ अंकांवर उघडला गेला. बाजार सुरु होताच सेन्सेक्स १९०अंकाच्या वृद्धीसह सुरू होऊन तब्बल 300 अंकांनी वर आला आहे. तर निफ्टीने १८३०० चा आकडा पार केला. दरम्‍यान, बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक ३९७.१४ अंकांनी वधारत ६१,४६४.३८ अंकांवर पोहोचला. निफ्टी ११९.६५ अंकांनी वाढून  १८,३१८.७५ वर होता.. मात्र शेअर मार्केट व्यवहार संपताना सेन्सेक्स २२८ अंकांनी घसरून ६०८३८ वर बंद झाला, तर निफ्टी ७३ अंकांनी घसरून १८१२५  वर बंद झाला.

आज निप्‍टीमध्‍ये सर्वाधिक ३.५० टक्‍क्‍यांची घसरण झाली. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रामध्ये २.४७टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 2.20 टक्के, आयशर मोटर्समध्ये 2.19 टक्के आणि इंडसइंड बँकेत 2.15 टक्के वाढ दिसून आली. निफ्टीमध्ये सन फार्मा, एसबीआय लाइफ, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

टाटा मोटर्ससह 'या' शेअर्समध्‍ये घसरण

आज बाजारात  टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह,  ॲक्सिस बँक, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो,  एनटीपीसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्‍या शेअर्समध्‍ये  घसरण दिसून आली. इतर आशियाई बाजारांमध्ये सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगच्या बाजारात तेजी दिसून आली. बुधवारी अमेरिकन बाजारही तेजीसह बंद झाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT