पुढारी ऑनलाइन डेस्क : Google New Feature : तुम्ही कितीही शिकलेले असू द्या पण प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रीप्शन वाचणे जड गेले असेल. किंबहुना अनेकांना डॉक्टरांनी काय लिहिले आहे हे आपल्याला समजत नाही फक्त मेडिकल दुकानदारालाच समजते. त्यामुळेच मेडिकल दुकानदाराला कोणते औषध कधी घ्यायचे हे विचारावे लागते. हा अनुभव अनेकांना असेलच. पण आता तुम्हाला प्रिस्क्रिप्शन निश्चितपणे वाचता येणार, कारण आहे गुगलचे नवे फिचर!
Google New Feature : गुगल भारतने लवकरच डॉक्टरांचे अक्षर कितीही खराब असू द्या तरी प्रिस्क्रिप्शन वाचता येणार असे फिचर घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन वाचता आले नाही तरी तुमचा स्मार्टफोन मात्र ही औषधांची नावे अगदी बिनचूक वाचेल.
Google New Feature : गुगल भारतने आपल्या सगळ्यात मोठ्या इवेंट गूगल फॉर इंडिया 2022 यामध्ये अनेक नवीन फीचर्स आणि प्रोडक्ट्सची घोषणा केली आहे. गुगलने म्हटले आहे की डॉक्टरांच्या हँडराइटिंगला डिकोड करणा-या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.
Google New Feature : असे काम करणार हे गुगलचे नवीन फीचर
यासाठी गूगल नवीन अॅप विकसित करत नाही आहे. तर गूगलचे जुन्याच फीचरमध्ये नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचा गूगल विचार करत आहे. गूगलच्या गूगल लेंस या फिचरला डॉक्टर्सच्या खराब अक्षराला डिकोड करण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. कारण भारतात सर्वात जास्त लोक गूगल लेन्सचा वापर करतात. वापरणारे तुम्हाला फक्त डॉक्टरच्या लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो काढून त्याला स्कॅन करावे लागेल. मग गूगल लेन्स त्याला सुटसुटीत शब्दांमध्ये डिस्प्ले करेल. तसेच तुम्ही याला शेअर देखील करू शकतात. मात्र, अद्याप तरी गुगलने या फीचर्सला रोलआउटची तारीख जाहीर केलेली नाही.
हे ही वाचा :