पुढारी ऑनलाईन डेस्क : महान फिरकी पटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न ( shane warne ) याचा ह्रदय विकाराच्या झटकाने अकाली निधन झाले. वयाच्या ५२ वर्षीच त्याला जीवनाच्या मैदानातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याने आपल्या फिरकीने अवघ्या विश्वाला एकप्रकारे मैदानावर नाचवले. त्याने त्याच्या काळातल्या अनेक दिग्गज फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. आज ही त्याने घेतलेले बळी चाहत्यांना आठवतात. मैदानासह मैदानाच्या बाहेर देखिल तो नेहमी चर्चेत राहणारा व्यक्ती ठरला होता.
१९९३ सालच्या ॲशेस मालिकेत मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत शेन वॉर्न ( shane warne ) या महान गोलंदाजाने इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगला बाद केलेला चेंडू क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम चेंडू असल्याचे म्हटले जाते. त्या चेंडूने शेन वॉर्नचे आयुष्यच बदलून टाकले. या गोलंदाजाने मनगटाच्या जादूने आपल्या काळातील जवळपास सर्वच दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 708 बळी घेतले. तर त्याने १९४ एकदिवसीय सामने खेळले यात त्याने २९३ बळी घेतले.
- शेन वॉर्नची ( shane warne ) कसोटी कारकीर्द 2 जानेवारी 1992 रोजी भारताविरुद्ध सिडनी येथे सुरू झाली. तो सामना त्याच्यासाठी अत्यंत वाईट ठरला. पहिल्या डावात त्याने आपल्याच चेंडूवर रवी शास्त्रीचा झेल सोडला. यानंतर रवी शास्त्रीने द्विशतक झळकावले. या सामन्यात सचिन आणि वॉर्न पहिल्यांदाच भेटले होते. या सामन्यात सचिनने 148 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, शेनवॉर्नला संपूर्ण सामन्यात 150 धावांत केवळ एक विकेट घेता आली होती.
- इंग्लंड हा शेन वॉर्नचा आवडता संघ होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मालिकेत वॉर्नने 34 बळी घेतले होते. त्यानंतर हे चक्र अखंडपणे सुरू राहिले. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडविरुद्धच्या 36 कसोटी सामन्यांमध्ये 23.25 च्या सरासरीने 195 बळी घेतले. 2005 च्या ऍशेस मालिकेत वॉर्नने 40 विकेट घेतल्या होत्या.
- शेन वॉर्न ( shane warne ) (1992-2007) ने त्याच्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चेंडू टाकले, परंतु 1993 मध्ये अॅशेस मालिकेदरम्यान त्याने एक चेंडू टाकला ज्याला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हटले गेले. वॉर्नने माईक गॅटिंगला त्याच्या लेग स्पिनवर बोल्ड केले, हा चेंडू तब्बल 90 अंशाच्या कोनात फिरला होता.
वॉर्नने माईक गॅटिंगला लेगसाईडला चेंडू टाकला. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता त्यामुळे गॅटिंगला तो वाईड जाईल असे वाटले. दरम्यान, चेंडू वेगाने वळला आणि गॅटिंगला चकमा देत त्याच्या ऑफ स्टंपवर आदळला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
वॉर्नने 4 वर्षांपूर्वी म्हणजे 24 वर्षांनंतर कबूल केले की 'बॉल ऑफ द सेंच्युरी' हा तोच चेंडू होता जो सर्व लेगस्पिन गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न करतात. या चेंडूने मैदानावर आणि मैदानाबाहेर माझे आयुष्य बदलले. मी शतकातील चेंडू टाकला याचा मला खूप अभिमान आहे. विशेषत: माईक गॅटिंगसारखा महान खेळाडू, जो इंग्लंड संघात फिरकी गोलंदाजीत निष्णात होता तोच या चेंडूवर बाद झाला.
- पहिल्या डावापेक्षा कसोटीच्या दुसऱ्या डावात वॉर्न अधिक मारक गोलंदाज होता. वॉर्नने पहिल्या डावात 64 वेळा गोलंदाजी करत 230 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले, तर तिसऱ्या आणि चौथ्या डावात वॉर्नने 129 डावात 22.85 च्या सरासरीने 359 बळी घेतले, हा एक विक्रम आहे.
- शेन वॉर्नने 1999 च्या विश्वचषकात आपली सर्वोत्तम गोलंदाजी सादर केली आणि उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानला पराभूत करून ऑस्ट्रेलियाला विश्वविजेते बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. वॉर्न त्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.