shaktiman movie  
Latest

Shaktimaan Teaser : शक्तीमान मोठ्या पडद्यावर, येतेय तीन चित्रपटांची सीरीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

भारतीय टीव्हीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक शक्तिमान (Shaktimaan Teaser) पुन्हा एकदा परत भेटीला येत आहे. पण, यंदा तो छोट्या पडद्यावर दिसणार नाही. तर मोठ्या पडद्यावर शक्तीमान दिसणार आहे. सोनी पिक्चर्स इंडिया (Sony Picturs India) ने सुपरहीरो टीव्ही शो शक्तिमानवर चित्रपट आणण्याची घोषणा केलीय. या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. सोनीने Shaktimaan चित्रपटाची घोषणा करत म्हटलं आहे-"भारताचा सर्वात लोकप्रिय, प्रेक्षकांचा आवडता आणि सर्वात मोठा सुपरहीरो शक्तिमान परत येणार आहे." (Shaktimaan Teaser)

सोनी पिक्चर्सने म्हटलंय-"भारतासह जगभरात काही कालावधीतचं अनेक सुपरहिरोच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर रेकॉर्ड केले आहेत. अशा परिस्थितीत वेळ आलीय, देशी सुपरहिरो समोर आणण्याची. आम्ही भारताचा सर्वात मोठा सुपरहिरो शक्तिमानचा जादू मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी तयार आहोत."

सूत्रांच्या माहितीनुसार, शक्तिमान चित्रपट, तीन चित्रपटांची एक सीरीज असेल. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनलने या चित्रपटाचे सर्व अधिकार खरेदी केले आहेत. कंपनीच्या एका मोठ्या दिग्दर्शकाला हा चित्रपट बनवण्याची जबाबदारी सोपवलीय.

टीजरमध्ये शक्तिमानचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये शक्तिमानसह दुसऱ्या अनेक कलाकारांना साईन करण्यात येत आहे.

शक्तीमान हा कार्यक्रम डीडी नॅशनलवर १३ सप्टेंबर, १९९७ ते २७ मार्च २००५ पर्यंत प्रसारित करण्यात आलं होतं. यामध्ये शक्तीमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती.

पाहा शक्तीमानचा टीजर-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT