पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉपस्टार शकीरा नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेतील शकिराच्या 'वाका वाका' गाण्याने तर साऱ्या जगाला ताल धरायला लावला होता. शकीरा तिचा पती बार्सिलोनाचा स्टार खेळाडू गेरार्ड पिक यांचं प्रेम, त्यांच्यातील कायदेशीर लढा, त्यांचं विभक्त होणं आणि त्यांच्या मुलांचा ताबा कोणाकडे या गोष्टी खूप चर्चेत आल्या होत्या. शकिरा आणि पिक का विभक्त झाले हे तुम्लाहा माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? शकीराला कसं समजलं तिच्या पतीचं विवाहबाह्य संबंध. एक साधी गोष्ट तुमचं गुपित उघडकीस आणू शकते. गेरार्ड पिकच्या बाबतीतही असंच झालं होतं. जाणून घ्या काय आहे ती गोष्ट. (Shakira)
प्रेमाची गोष्टही भन्नाट
बार्सिलोनाचा स्टार खेळाडू गेरार्ड पिक आणि पॉपस्टार शकीरा यांच्या प्रेमाची गोष्टही भन्नाट आहे. 2010 च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे वाका-वाका या गाण्याच्या शूटिंगदरम्यान शकिरा आणि जेरार्ड यांची पहिली भेट झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर शकिरा आणि जेरार्ड हे दोघे विवाहित झाले. २०११ पासून एकत्र राहू लागले. त्यांना दोन मुलेही आहेत. विशेष आणि चर्चेची गोष्ट म्हणजे गेरार्ड पिक आणि शकिरा यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी आहे. शकीरा ही गेरार्ड पिकपेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म कोलंबियामध्ये 1977 मध्ये झाला असून जेरार्ड पिकचा जन्म 1987 मध्ये स्पेनमधील बार्सिलोना शहरात झालाय. पण १२ वर्षाच्या नात्यामध्ये असं काय झालं की, दोघांच्यात दुरावा निर्माण होऊन विभक्त होण्यापर्यंत आला. याच कारण होतं गेरार्ड पिकचं दुसऱ्या एका महिलेसोबत असलेलं अफेअर. जेव्हा शकिराला गेरार्ड पिकचं विवाहबाह्य संबंध आहे हे समजले तेव्हा तिने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला.
Shakira : वाका-वाका
पॉपस्टार शकिराने २०१० वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेतील शकिराने 'वाका वाका' गाण्याला आवाज दिला होता. तसेच या गाण्यात जेरार्ड पिक ही दिसला होता. या गाण्यानेच त्यांना एकत्र आणलं होतं. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत जेरार्डने स्पेनला प्रथमच विश्वविजेते बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
Shakira : विभक्त होणं आयुष्यातला खूप कठीण अनुभव
बारा वर्षे जेरार्ड पिक आणि शकिरा एकत्र होते. विश्वचषकासाठी 'वाका वाका' क्लिपवर काम करत असताना त्यांची पहिली भेट झाली. एक दशकाहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या नात्यात त्यांनी मिलान आणि साशा या दोन मुलांचे स्वागत केले. पण अचानक एक धक्कादायक माहिती समोर आल्यावर तिनं विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. यावर ती एका वृतवाहिनीशी बोलत असताना म्हणाली की, "याबद्दल वैयक्तिकरित्या बोलणे खरोखर कठीण आहे. कारण मी अजूनही त्या त्रासातून जात आहे, कारण मी लोकांच्या नजरेत आहे आणि आमचे वेगळेपण आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मुलांसाठी देखील कठीण आहे"
शकिराला कसं समजल की गेरार्ड पिक तिला धोका देत आहे?
शकिराला गेरार्ड पिकचं विवाहबाह्य संबंध आहे हे समजताच तिने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. शकिरा नेहमी आपल्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे सतत देश-विदेश दौरे करत असते. एकदा ती घरी परतल्यावर तिला जॅम खाल्लेलं दिसलं. तिथे जॅमची बाटली होती. शकिराला स्ट्रॉबेरी जाम खायला आवडत असे आणि पिकला जॅम आवडत नाही. तेव्हा तिला शंका आली आपण घरात नसल्यावर कोणीतरी घरी होते. त्यानंतर एका महिलेसोबतचा व्हायरलं होणारा फोटो तिने पाहिला. तिथून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. जेव्हा शकिराला गेरार्ड पिकचे विवाहबाह्य संबंध आहे हे समजले तेव्हा तिने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. गेरार्ड पिकचं नाव सॉकर खेळाडू क्लारा चिया मार्टी नावाच्या एका तरुण महिलेसोबत जोडंल जात होतं.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.