Latest

Pathaan : १४ व्या दिवशी घसरण; ‘पठान’चे कलेक्शन ८.१५ कोटी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या 'पठान' ( Pathaan ) ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पठाv रोज कोटींची कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर भरघोष अशी ५३५ कोटींचा टप्पा पार केला आहे. यानंतर आता मात्र, पठानचे दिवसेंदिवस घसरण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूखच्या पठान ( Pathaan ) ने १४ व्या दिवशी म्हणजे, मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. चित्रपटाने १४ व्या दिवशी ८.१५ कोटींची कमाई केली आहे. त्यापैकी ७.९५ फक्त हिंदीतील कमाई आहे. दुसरीकडे देशात हिंदीत पठानची एकूण ४३०. ७० कोटी आणि सर्व भाषा मिळून ४४६.६० कोटींची कमाई केली आहे. तर १४ व्या दिवसाच्या कमाई मिळून ही आकडेवारी ५३५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. याशिवाय जगभरात शाहरुखच्या पठानने ८७० कोटींचा भरघोष गल्ला जमवला आहे.

याआधी पठानने १३ व्या दिवशी म्हणजेच चित्रपटाच्या रिलीजनंतरच्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत ही आकडेवारी निम्म्याहून खाली आली. यामध्ये ४०% पर्यंत घसरण होत चित्रपटाने ९-१० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली होती. त्यानंतर चौदाव्या दिवशी हा आकडा आणखी खाली आला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT