Pathaan : ‘पठान’ची बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग, ७०० कोटींचा जमवला गल्ला | पुढारी

Pathaan : 'पठान'ची बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग, ७०० कोटींचा जमवला गल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : पठान (Pathaan) बॉक्स ऑफिसवर रोज नवा इतिहास रचताना दिसत आहे. नवव्या दिवशी पठाणचे ऑल इंडिया नेट कलेक्शन १५.५० कोटी इतके होते. तर जगभरात या चित्रपटाने ७०० कोटींची कमाई केली आहे. ही कमाई पाहता हा चित्रपट लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो, असा अंदाज लावला जाऊ शकतो. (Pathaan)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ लोकांना वेड लावत आहे. चित्रपटाच्या रिलीजला ९ दिवस झाले आहेत आणि बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे. चित्रपटाचे नऊ दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, नवव्या दिवशी ‘पठाण’चे ऑल इंडिया नेट कलेक्शन १५.५० कोटी इतके होते. ९ दिवसांच्या कलेक्शनसह ‘पठाण’ने आतापर्यंत ३६४ कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी हिंदीत ५५ कोटींची कमाई केली. दुसरीकडे, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६८ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३८ कोटींचा व्यवसाय केला. यानंतर या चित्रपटाने वीकेंडला तब्बल ११- कोटींची कमाई केली.

बॉक्स ऑफिसवर ८व्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

दुसरीकडे, चित्रपटाने सोमवारी २५.५० कोटी आणि मंगळवारी २२ कोटींची कमाई केली. मात्र, सातव्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी मंदावली होती. पण चित्रपटाची नवव्या दिवशी झालेली कमाई पाहता ‘पठाण’ येत्या काही दिवसांत अनेक मोठे रेकॉर्ड तोडताना दिसणार आहे.

व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी नवव्या दिवसाचे जगभरातील कलेक्शन शेअर केले आहे. रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार पठाणने ९ दिवसांत जगभरात ७०० कोटी रुपये कमावले आहेत.

Back to top button