Pathaan 
Latest

Pathaan Collection: ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड तोडायला तयार पठान

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानच्या पठानची जादू १९ व्या दिवशीही कायम आहे. आतापर्यंत पठाण चित्रपटाने  (Pathaan Collection)वर्ल्ड वाईड ९०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात या कमाईचा आकडा ५०० कोटी पार करायला तयार आहे. एकूणचं कलेक्शन पाहता पठाण बाहुबली २ चा रेकॉर्ड तोडायला तयार आहे. (Pathaan Collection)

पठानचा जादू वीकेंडलाही कायम आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाने १९ व्या दिवशीही १२.५० कोटींची कमाई केवळ हिंदी व्हर्जनमध्ये केली आहे. तर हिंदी भाषेत भारतात ही कमाई ४८६.२५ कोटी झाली आहे.

बाहुबली २ चा रेकॉर्ड तोडण्यास सज्ज

वर्ल्ड वाईड चित्रपटाची कमाई १००० कोटींकडे इशारा दाखवत आहे. ग्लोबल बॉक्स ऑफिसमध्ये ९५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जर कमाईने गती पकडली तर पठाण बाहुबलीचा रेकॉर्ड तोडू शकतो.

शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठानने १८ व्या दिवशी एकूण १०.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ओव्हरऑल इंडियाचे ग्रॉस कलेक्शन ५७२ कोटी झाले होते. तर चित्रपटाने वर्ल्ड वाईड ९२४ कोटींची कमाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT