नगर : कोश्यारींकडून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग : उपसभापती नीलम गोर्‍हे | पुढारी

नगर : कोश्यारींकडून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग : उपसभापती नीलम गोर्‍हे

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची निवड त्यावेळी सरकार योग्य वाटली म्हणून करण्यात आली. आता मुदत संपण्याआधीच त्यांनी राजीनामा स्वीकारला गेला आहे. महापुरूषांबद्दल निराधार, निंदनीय अवमानकार विधाने केली. ते राज्यपाल असल्यामुळे लोकप्रतिनिधींची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशी झाली. त्यांच्या बद्दलची नाराजी अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपेक्षाभंग केला. नवी येणार्‍या राज्यपालांकडून सर्व पक्षांना समानसंधी, न्याय मिळावा, अशी अपेक्षा विधानसभेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.

उपसभापती निलम गोर्‍हे रविवारी (दि.12) औरंगाबादहून नगरला आल्या असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे आदी उपस्थित होते. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्येष्ठनेते शरद पवार यांनी महिला धोरण जाहीर केले. त्यानंतर तीन महिला धोरण जाहीर झाले. आता चौधे महिला धोरण 2023 मध्ये येत आहे. तसेच केंद्रीय महिला धोरण तयार होत आहे. त्यात कोविड काळातील एकल महिला, शेत मजूर महिला, असंघटित कामगार महिला यांचा अंतर्भाव असावा.

त्यांना समान काम समान वेतन असावे, त्यासाठी वेतन आयोग निर्माण करावा, नोकरी व बढतीसाठी महिलांना वयोमर्यादेत सुट मिळावी, कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस वेगवेगळ्या तीन ठिकाणी चालतात. या केसेच एकाच छत्राखाली याव्यात, अशा तरतुदी नव्या महिला धोरणात समाविष्ट कराव्यात, अशी मागणी सरकारकडे असे सांगून त्या म्हणाल्या, शिर्डी देवस्थानमध्ये गेल्या काही वर्षात 5 पेक्षा अधिक सीईओ बदलले आहेत. त्यामुळे तेथे धोरण ठरविणे अवघड होत आहे. शिर्डी देवस्थानला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत आहेत. हा निधी त्यांनी सामाजिक कामासाठी खर्च करायला हवा. दरवर्षी राज्यात 3 ते 4 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. या अनाथ मुलांसाठी शिर्डी देवस्थानने वसतिगृह बांधून त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी पालकत्व स्वीकारायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

पत्रकार वारिसे कुटुंबियांना 25 लााखांची मदत
पत्रकार शशिकांत वारिसे निर्भिड पत्रकार होते. सरकारच्या वतीने वारिसे कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर, शिवसेनेच्यावतीने मदत जाहीर करण्यात आली आहे. आपण स्वत: स्वनिधीतून 51 हजार रुपये मदत देत असल्याचे गोर्‍हे यांनी येथे जाहीर केले. वारिसेप्रकरणाची कसून चौकशी करावी, अशा सूचनाही पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. पोलिसांनी पत्रकारांना येत असलेल्या धमक्यांची गांभीर्याने दखल घेऊन तपास करायला हवा, असे त्या म्हणाल्या.

तुळजापूरला गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा
तुळजापूर देवस्थानातील भोपे-पुजार्‍यांकडून काही ठराविक लोकांना गाभार्‍यात दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. महिला प्रवेश दिला जात नाही. महिलांना पूजा-अर्चा व इतर धार्मिक विधींसाठी थेट गाभार्‍यात प्रवेश मिळावा. मात्र, ट्रस्ट त्यांना परवानगी देत नाही. गाभार्‍यात पुरुष चालतात. मग स्त्रिया का नाही. शनि शिंगणापूरला चौथर्‍यावर पूर्वी महिलांना प्रवेश नव्हता. महिलांच्या संघर्षानंतर शिंगणापूरला प्रवेश मिळाला. तसा तुळजापूरला मिळावा, असे गोर्‍हे म्हणाल्या.

Back to top button