नगर : माजी मंत्री धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर | पुढारी

नगर : माजी मंत्री धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर

चिंचपूर पांगूळ : पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल (दि.12) सकाळी 11.30 वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर जाऊन सद्गुरू गहिनाथ महाराज तथा संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. माजी मंत्री मुंडे हे मुबंईवरून हे हेलिकॉप्टरने गडावर आले. त्यानंतर त्यांनी वै. वामनभाऊ यांच्या समाधीवर अभिषेक करीत विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर गडावर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत सत्कार स्वीकारून त्यानंतर ते परळीकडे रवाना झाले.

यावेळी आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नाकाडे, पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ, रामकृष्ण बांगर, सतीश आबा शिंदे, क्रिकेट खेळाडू ऋषिकेश सोनवणे, कृष्णा मिसाळ, हनुमंत बडे, नितीन बारगजे, उद्धव केदार, पप्पू साळवे, दादासाहेब राजगुरू, दत्ता नागरगोजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी मंत्री मुंडेे यांचा काही दिवसांपूर्वी गाडीचा अपघात झाला होता. त्यात ते जखमी झाले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारानंतर सक्तीची विश्राती घेण्यास सांगितले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर कामकाज सुरु करण्याआधी आपण संत वामनभाऊ तसेच गहिनीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळचे दर्शन घेऊ, तसेच महंत विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक कामास सुरुवात करणार होतो. त्यामुळे आज गडावर आलो आहे, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवाजीराव नाकाडे व कार्यकर्त्यानी जेसीबीमधून धनंजय मुंडेे यांच्यावर फुलांची उधळण करीत क्रेनच्या साह्याने फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले.

Back to top button