shahrukh khan 
Latest

Dunki Trailer: फक्त ‘दम’ शाहरुखमध्येच! ‘डंकी: ड्रॉप ४’ चा ट्रेलर पाहाच!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानच्या 'डंकी: ड्रॉप ४' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात शाहरुख खानच्या ट्रेन सीन्समधून होते. यावेळी तो एकदम साधा आणि सरळ भोळ्या भूमिकेत दिसत आहे. (Dunki Trailer) चित्रपटामध्ये तापसी पन्नू, बोमन ईरानी, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर यांचीही झलक दिसतेय. (Dunki Trailer)

संबंधित बातम्या –

या चित्रपटाची शानदार स्टोरी ट्रेलर दिग्दर्शक राजकुमार हिरानीद्वारा बनवण्यात आलं आहे. चित्रपटामध्ये शाहरुख खान 'पठान' आणि 'जवान' मधील भूमिकांपेक्षा वेगल्या अंदाजात दिसत आहे. या ट्रेलरच्या कथेची सुरुवात २९९५ च्या कहाणीपासून सुरु झालीय. ही झलक पाहिल्यानंतर शाहरुख खानच्या 'दिलवाले दिल्हनिया ले जाएंगे' चित्रपटाची आठवण येते. ३ मिनट २१ सेकंदाचा व्हिडिओ खूप सुंदर आणि शानदार आहे.

हार्डी म्हणजेच शाहरुख खानच्या दृश्यापासून सुरुवात होते. तो पंजाबमधील एक सुंदर गाव लाल्टू येथे पोहोचतो. त्याला मनु, सुखी, बग्गू, आणि बल्ली यासारखे काही मित्र भेटतात. त्या सर्वांचे लंडन जाणे हे एक स्वप्न असते. 'डंकी'ची इंटरेस्टिंग कहाणी आणि वेगवेगळ्या भूमिका आणि इमोशन्ने भरपूर आहे. खूप सुंदरतेने एकाच फ्रेममध्ये याची कथा बवण्यात आलीय. चार मित्रांचा आव्हानांनी भरलेला शानदार प्रवास ३ मिनिटे २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT