shahrukh khan and Aryan Khan  
Latest

SRK : आर्यनला तुरुंगात पाहून शाहरुखची अशी झाली होती अवस्था

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  शाहरुख खानचा (SRK ) मुलगा आर्यन खान याला नुकतीच क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ( एनसीबी)  क्लीन चिट मिळाली. हे हाय-प्रोफाईल प्रकरण गाजत असताना शाहरुख खानची प्रचंड  घालमेल झाली हाेती. या प्रकरणात आर्यन खानला तुरुंगात जावे लागले होते. आता याबाबत एका 'एनसीबी' अधिकाऱ्याने आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान कशा प्रकारे भावूक झाला होता, याविषयी सांगितले आहे. (SRK)

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने त्याच्या मुलाच्या अटकेवर पूर्णपणे मौन पाळले होते. आता, एनसीबीचे उपसंचालक संजय सिंह यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना खुलासा केला की, आर्यन आमच्या ताब्यात असताना सुपरस्टारने त्याची भेट घेतली होती. त्यावेळी शाहरुखचे डोळे पाणावले .

२०२१ मध्ये बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) चं नाव एका ड्रग्ज केसमध्ये जोडलं गेलं होतं. एनसीबीने २ ऑक्टोबर, २०२१ रोजी मुंबईहून गोवा जाणाऱ्या इंटरनॅशनल क्रुझवर छापा टाकला होता. यावेळी आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. २६ दिवसांच्या चौकशीनंतर आर्यनची २८ ऑक्टोबरला जामीनावर सुटका झाली होती. नुकतीच ड्रग्ज प्रकरणात आर्यनला क्लीनचिट मिळाली.

'आम्हाला एखाद्या गुन्हेगारा प्रमाणे दाखवण्यात आलं'

संजय सिंह यांनी एका इंग्रजी वेबसाईला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आर्यन कस्टडीमध्ये होता. तेव्हा शाहरुख आर्यनच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थविषयी खूप टेन्शनमध्ये होता. शाहरुखने आर्यनसोबत रात्रभर थांबण्याची परवानगी मागितली होती, जी त्याला मिळाली नाही. त्यानंतर शाहरुखने आरोप केले होते की, कोणत्याही पुराव्याअभावी बदनाम केलं जात आहे. यादरम्यान त्याच्या डोळ्यातून अश्रू निघाले. आम्हाला एखाद्या गुन्हेगार किंवा मॉन्स्टर प्रमाणे दाखवण्यात आलं आहे, असेही तो यावेळी म्हणाला होता

हेदेखील वाचा- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT