'दिवाना' चित्रपटापासून बाॅलिवुडच्या यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या किंग खान शाहरुख सध्या आपल्या चित्रपटांमुळे नाही तर आपल्या मुलामुळे म्हणजे आर्यन खानमुळे बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. कारण, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान पुरता अडकला आहे. आर्यन खानला अटक झाली तेव्हा शाहरुख खानचे जुने मुलाखतीचे आणि आर्यन खानचे फोटो चर्चेमध्ये आले. त्यात शाहरुखची एक मुलाखत समोर आली, ज्यामध्ये तो म्हणतो आहे की, "माझं मोठं झालेलं नाव माझ्या मुलांचं जीवन खराब करू शकतं."
शाहरुख खानने २००८ साली एका जर्मन टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्याने त्याच्या मनातील भीती स्पष्ट केली होती. त्यात तो म्हणतो की, "माझ्या जीवनातील सर्वात मोठी भीती ही माझ्या मुलांसाठीची आहे. मी आशा करतो की, माझ्या प्रसिद्धीच्या झोतापासून माझी मुलं बाहेर राहतील. ही माझी किमान अपेक्षा आहे."
"माझ्या प्रसिद्धीचा प्रभाव माझ्या मुलांवर पडला तर… ही माझी सगळ्यात मोठी भीती आहे. माझी इच्छा आहे की, आम्ही आमच्या वडिलांपेक्षाही जास्त चांगले आहोत. हे खरं आहे की, माझी प्रसिद्धी माझ्या मुलांचं जीवन खराब करण्याची शक्यता आहे आणि असं होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांचा वडील आहे, अशी ओळख मिळावी, अशी माझी इच्छा आहे. माझ्यामुळे माझी मुळे ओळखली जाऊ नयेत, असं मला वाटतं", असंही शाहरुख खान म्हणतो.
करण जोहरच्या 'काॅफी विथ करण' या कार्यक्रमात करणशी संवाद साधताना शाहरुख भावनिक होऊन सांगतो की, "आपल्या जीवनात एखाद्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेणं म्हणजे आपल्या शरीराचा एक तुकडा शरीरापासून बाजुला करणं असतं. मी नात्यांकडे असं पाहतो की, माझा जिगरी दोस्त उभा आहे आणि त्याच्याजवळ एखादं वादळ घोंगावत येत असेल तर त्याला बाजूला करून मी त्यामध्ये उडी घेईन", असं शाहरुख खाननं म्हंटलं आहे.
हे वाचलंत का?