Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ७३ हजारांवर, निफ्टी २२,२०० जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी दोन सत्रांतील घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ३०५ अंकांनी वाढून ७३,०९५ वर बंद झाला. तर निफ्टी ७६ अंकांच्या वाढीसह २२,१९८ वर स्थिरावला. आज सुमारे १,३४० शेअर्स वाढले. तर १,९६८ शेअर्स घसरले आणि ७२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर ऑटो, कॅपिटल गुड्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फार्मा, रियल्टी प्रत्येकी ०.५ ते १ टक्क्यांनी वाढले. तर ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्याने घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात किरकोळ घसरण झाली.

बाजारात रिकव्हरीचा मूड

बाजारात चढ-उतारादरम्यान रिकव्हरीचा मूड दिसून आला. ‍आजच्या ट्रेडिंग सत्रात विशेषत निफ्टीने जोरदार रिकव्हरी केली. कालच्या घसरणीनंतर आयटी आणि रियल्टी शेअर्स सावरताना दिसले. जागतिक कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार आज सपाट खुला झाला होता. त्यानंतर बाजारात तेजी परतली.

'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, टीसीएस, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील हे तेजीत राहिले. तर बजाज फायनान्स, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर टाटा मोटर्स, टीसीएस, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्प आणि सन फार्मा हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एसबीआय, डिव्हिस लॅब्स हे टॉप लूजर्स ठरले. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी आयटीमध्ये ०.७२ टक्क्यांची वाढ दिसून आली. (Stock Market Closing Bell)

 हेवीवेट शेअर्स तेजीचा निफ्टीला सपोर्ट

टीसीएस, सन फार्मा, मारुती सुझुकी, आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांसारख्या हेवीवेट शेअर्समधील तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला सुरुवातीच्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी मदत झाली.

वोडाफोन आयडियाचे शेअर्स आजच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी घसरून १६ रुपयांवर आला. वोडाफोन आयडिया बोर्ड बैठकीच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. (Vodafone Idea Share Price)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT