Latest

”नोकरकपातीमुळ अनेकजण उद्ध्वस्त!, पण मी नाही…”, १९ वर्षाची नोकरी गमावल्यानंतर Google अभियंत्याची पोस्ट चर्चेत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : गुगलने नुकतेच सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली होती. गुगलने खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे कारण दिले आहे. या नोकरकपातीनंतर गुगलमध्ये १९ वर्षे काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याची पोस्ट चर्चेत आली आहे. नोकरी गमावलेल्या शेकडो कर्मचार्‍यांपैकी तो एक आहे. त्याने Google सोबत जवळपास दोन दशके काम केले. केविन बोरिलियन असे त्याचे नाव आहे. १९ वर्षांची नोकरी त्याला एका रात्रीत गमवावी लागली.

विशेष म्हणजे नोकरीवरून काढून टाकल्यानंतर येणाऱ्या आव्हानांची कबुली देताना, बोरिलियनने आश्चर्यकारकपणे सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, या वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंत्याने नोकरकपातीमुळे त्याला आराम करण्याची, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि छंद जोपासण्याची संधी मिळेल, असे म्हटले आहे.

"एका युगाचा अंत! Google मध्ये १९ वर्षे काम केल्यानंतर, मी तयार केलेल्या टीममधील १६ हून अधिक जणांसह मला काल सकाळी कठोर निर्णयाची माहिती मिळाली. मला कळले की माझी १९ वर्षाची नोकरी एका रात्रीत गेली," असे त्याने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनेक लोकांना, त्यांची नोकरी जाणे निराशाजनक आणि उद्ध्वस्त करणारे आहे. त्याच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, Bourrillion ने Google मध्ये १९ वर्षे आणि चार महिने काम केले आहे.

"नोकरकपात निराश करणारी आहे, पण माझ्या बाबतीत … हे ठीक आहे, कारण मला माझ्या आयुष्यात खूप दिवसांपासून काहीतरी नवा बदल हवा आहे," असे त्याने म्हटले आहे. "आणि आता इतर कोठेही लगेच जाण्याचा माझा कोणताही विचार नाही. मला खूप काही करायचे आहे, जसे की सायकल चालवणे, वाचन करणे, ड्रम शिकणे पुन्हा सुरु करणे, प्रवास करणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे."

या माजी गुगल कर्मचाऱ्याने ही चर्चा इथेच थांबवत असल्याचे सांगत " मला सहानुभूती दाखवू नका" असे आवाहनही केले आहे. "माझ्या १९ वर्षांच्या नोकरीच्या कारकिर्दीत मला ज्या लोकांसोबत काम करायला मिळाले आणि ज्या गोष्टी मला खूप मोठा आशीर्वाद म्हणून करायच्या होत्या…आणि त्यासोबतच, मी माझे आयुष्य कसे जगायचे याचा शोध घेत आहे," असे त्याने शेवटी म्हटले आहे.

Google ने गेल्या बुधवारी नोकरकपातीची घोषणा केली होती. याचा फटका डिजिटल असिस्टंट, हार्डवेअर आणि इंजिनिअरींग टीममध्ये काम करणार्‍या कर्मचाऱ्यांना बसला. गुगल प्रमाणेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम या इतर कंपन्यांनी २०२४ मध्ये आधीच नोकरकपातीची घोषणा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT