piyanka chopra-nick jonas and selena-gomez 
Latest

Selena Gomez : निक जोनस गे आहे? एक्‍स गर्लफ्रेंड सेलेनाने केला मोठा खुलासा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : निक जोनस सध्या आपल्या बाळासमवेत छान दिवस एन्जॉय करत आहे. त्याचं प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफ देखील सेटल आहे. सध्या निक रिअल लाईफमध्ये एक उत्तम पतीसोबतच एका वडिलाच्या भूमिकेतही आहे. प्रियांका चोप्रा-निक जोनस सरोगेसी पेरेंट झाले आहे. निक-प्रियांकाने २०१८ मध्ये लग्न केले होते. पण, त्याआधी निकने अनेक मुलींना डेट केलं होतं. त्यापैकी एक होती-सेलेना गोमेज. सेलेना गोमेजला एका चॅट शोमध्ये निकविषयी असा प्रश्न विचारण्यात आला की, सर्वांनाच हसू आले.

हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री सेलेना गोमेज (Selena Gomez) एकेकाळी निक जोनससोबत अफेअरवरून चर्चेत आली होती. २००८ मध्ये दोघांचे नाते सुरू झाले होते. सेलेना – निकची जोडीही त्यांच्या चाहत्यांना आवडली होती. सेलेना गोमेजशिवाय निकने प्रसिध्द गायिका मायली सायरसला (Miley Cyrus) डेट केलं होतं.

सेलेना गोमेज – निक जोनसचे नातं संपुष्टात आले. पण, जेव्हा निकविषयी सेलेाला विचारण्यात आले, तेव्हा सेलेनाने त्याचे कौतुकच केले. एका चॅट शोदरम्यान, सेलेना गोमेजला निक जोनसच्या सेक्सुॲलिटी (Nick Jonas Sexuality) विषयी प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी सेलेनाने खूप मजेशीर उत्तर दिलं.

निक गे आहे का?

प्रसिध्द होस्ट एंडी कोहेन (Andy Cohen) ने आपल्या चॅट शो 'वॉच व्हॉट हॅपेन्स लाईव्ह'वर सेलेना गोमेजला गेस्ट म्हणून बोलावलं होतं. या शोवर तिने गायिका टेलर स्विफ्ट आणि डेमी लोवाटोसोबतच्या मैत्रीवर चर्चा केली. यानंतर एंडीने निकबाबत प्रश्न उपस्थित केला की, 'निक जोनस, गॉर्जियस, दिवसेंदिवस खूप गॉर्जियस होत जात आहे. त्याने नुकताच चित्रपट स्क्रीम क्वीन आणि किंगडममध्ये गेची भूमिका केलीय. जर १ ते १० च्या स्केलमध्ये निक जोनस कुठे बसतो?' याच्या उत्तरादाखल सेलेना गोमेज म्हणाली-'मी त्याला डेट केलंय. झिरो.' सेलेनाची ही गोष्ट ऐकून शोवर बसलेले प्रेक्षक जोरजोरात हसू लागले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT