Hardik-Natasa : हार्दिक-नताशाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, शेअर केला फोटो | पुढारी

Hardik-Natasa : हार्दिक-नताशाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, शेअर केला फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशाच्या (hardik- Natasa) घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. तशी पोस्ट स्वत: हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केलीय. हार्दिकने ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर Welcome to the world, baby Kavir ❤️ Agu has big brother duties now 😛 अशी पोस्ट लिहिलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या घरी मोठ्या भावाला आता काविरची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (hardik- Natasa )

Shraddha Kapoor : श्रद्धाच्या मनमोहक मदमस्त नयनांनी केलं घायाळ

त्याने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तो नवजात बाळासह दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये बाळ आणि पत्नी नताशाही दिसतेय. पोस्टमध्ये त्याने ऑग्सट महिन्याचाही उल्लेख केलेला दिसतो आहे. या बाळाचे नाव काविक (Kavir) असल्याचे त्याच्या पोस्टमधून समजते. तसेच त्याने एका रेड हार्ट इमोजीही शेअर केलेली दिसतो.

दरम्यान, अभिनेत्री नताशा आणि टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविकचे बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. नताशा स्टेनकोविकने बिकिनी शूटचे काही बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या या फोटोंना पाहून कमेंट देण्यापासून रोखू शकला नाही.

नतासाने आपला मुलगा आणि पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय केले. यावेळी नतासा स्टेनकोविकने बिकिनी शूटचे काही बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये नाताशाने चेक प्रिंटची बिकिनी घातलेली दिसते. ती समुद्र किनारी पाण्यात एन्जॉय करताना दिसते. नताशा आणि हार्दिक काही दिवसांपूर्वी ग्रीसमध्ये सेंटोरिनी आयलंडमध्ये सुट्ट्यांसाठी गेले होते.

Back to top button