Latest

Aliens Signals : मंगळावरून पृथ्वीवर आलेल्या एलियन्सच्या सिग्नलबाबत शास्त्रज्ञांचा खुलासा; म्हणाले, ‘तो एन्कोडेड संदेश हा…’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील अनेक शास्त्रज्ञ एलियन्सच्या शोधात रात्रंदिवस झटत आहेत. या दिशेने आतापर्यंत फारसे यश मिळालेले नाही, परंतु भविष्यात मानवाला एलियन्सचा सामना करता यावा यासाठी प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जर पृथ्वीच्या बाहेर जीवन असेल तर कधी ना कधी एलियन्स तिथून आपल्याला सिग्नल पाठवतील. आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ते करतील असे सूचक वक्तव्य शास्त्रज्ञ करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळावरुन (Mars) एलियन्सने पृथ्वीवर सिग्नल पाठवले असल्याची चर्चा रंगली आहे.

एलियन्सने पाठवलेल्या सिग्नलची चर्चा खूप रंगली आहे. पण हा सिग्नल कोणत्याही परकीय सभ्यतेने पाठवला नसून तर मनुष्यानेच पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. हा सिग्नल 16 मिनिटांत पृथ्वीवर पोहोचला आहे. एका अहवालानुसार, युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars ट्रेस गॅस ऑर्बिटर (TGO) ने बुधवारी रात्री 9:00 वाजता मंगळाच्या कक्षेतून पृथ्वीला एक एन्कोडेड संदेश पाठवला. हा संदेश १६ मिनिटांमध्ये पृथ्वीवर पोहोचला. एलियनचा संदेश जेव्हा प्रत्यक्षात आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा परिस्थिती काय असेल हे जाणून घेणे हा ESA चा उद्देश आहे.

या प्रकल्पाला 'अ साइन इन स्पेस' प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॅनिएला डी पॉलीस यांनी सांगितले की, एलियन्सकडून संदेश मिळणे हा संपूर्ण मानवजातीसाठी एक सखोल आणि परिवर्तनकारी अनुभव असेल. Daniela De Paulis हे SETI या संस्थेत आहेत. TGO कडून आलेला संदेश डीकोड करण्यासाठी जगभरातील तज्ञ आणि शास्त्रज्ञ एकत्र काम करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT