सर्वोच्‍च न्‍यायालय ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

Teacher recruitment scam : अभिषेक बॅनर्जी यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पश्‍चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीला स्थगिती देण्याच्या विनंतीची तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१०) फेटाळून लावली. (Teacher recruitment scam)

कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणी अभिषेक यांच्या चौकशीचे निर्देश दिले होते. याबाबत दिलासा हवा असेल तर परत कोलकाता उच्च न्यायालयात जावा, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली. ईडीने समन्स पाठवूनही अभिषेक बॅनर्जी यांनी हजर राहण्यास नकार दिला होता. प. बंगालमध्ये सुरु असलेल्या जन संयोग यात्रेत सामील असल्याने आपण कोलकात्याच्या ईडी कार्यालयात हजर राहू शकत नाही, असे कारण त्यावेळी बॅनर्जी यांनी दिले होते. (Teacher recruitment scam)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT