पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटकेची गंभीर दखल घेतली आहे. तुम्ही कोणालाही न्यायालयातून कसे अटक करता, हा न्यायालयाचा अवमान आहे, असे खडेबोल सुनावत इम्रान खान यांना एक तासाच्या आता न्यायालयासमोर हजर करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानमधील नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) आज दिले. इम्रान खान यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईविरोधात पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या वतीने दाखल याचिकेवर आज ( दि. 11) सुनावणी झाली.
९ मे रोजी इम्रान खान यांना अटक करण्यातआली. यानंतर देशभरात हिंसाचार पसरवण्यात आला. लष्करावर हल्ला झाला. इस्लामाबाद हायकोर्ट आणि नॅशनल अकाउंटेबिलिटी कोर्टानेच ही अटक कायदेशीर पद्धतीने केल्याचे म्हटले आहे, असे पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, सिंध प्रांत वगळता पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. पीटीआय नेते फवाद चौधरी यांना रात्री उशिरा आणि शाह महमूद कुरेशी यांना गुरुवारी सकाळी हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत इम्रानच्या पक्षाचे सुमारे १९०० नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
९ मे रोजी इम्रान खान यांना अटक झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९० लोक जखमी झाले आहेत. बुधवारी इम्रान खानला ८ दिवसांच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा :