Sayali Sanjeev  
Latest

Sayali Sanjeev : अंगणातल्या रातराणीला बहर; सोज्वळ सायलीचं निखळ सौदर्यं ❤️❤️

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटातून अभिनयाची मोहर उठवणारी मराठी अभिनेत्री सायली संजीवची ( Sayali Sanjeev ) पुन्हा एकदा चर्चा आहे. या चित्रपटात तिने जबरदस्त सईबाईची मुख्य भूमिका साकारल्यानंतर सायलीला पुन्हा एकदा नवा चित्रपट येत आहे.  ती तिच्या आगामी 'गोष्ट एका पैठणीची' आणखी एक धमाकेदार मराठी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तिने कसलीही कसूर केली नाही. याच दरम्यान तिचा धमाकेदार पारंपारिक, मराठमोळा लूक समोर आला आहे. सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडलाय.

आगामी 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सायली संजीव ( Sayali Sanjeev ) सध्या बिझी आहे. याच दरम्यान सायलीचा पारंपारिक साजश्रृंगारासोबत नजाकत चाहत्याच्या भेटीस आला आहे. नुकतेच तिने ब्ल्यू कलरच्या सहावारी साडीसोबत ग्रीन कलरच्या बॉऊजने चारचॉंद लावले आहेत. कोसांची स्टाईल, नाकात मोत्याची नथ, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला तिने ब्ल्यू रंगाचा हार्ट ईमोजी शेअर केला आहे. या फोटोमधील सायलीचे मनमोहक सौदर्यं आणि तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सायलीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Beautiful ?', '❤️ बहार❤️', 'अंगणातल्या रातराणीला बहर आला…???', 'अप्रतिम गाणं आणि सोज्वळ सायली ❤️❤️', 'You look very pretty in the saree..', 'Khup chhan? ?', 'Gorgeous ?', '❤️Prem❤️', 'खूप सुंदर?', 'मराठी सौंदर्यवती अप्सरा??', '?pretty ? very pretty ?', 'Crush?', 'घनगर्द पैठणीत शुभ्र चांदणं ????', 'धरतीच्या देही सजे नवथर लेणं ??❤️❤️', '?? stunning beauty ??', '❤️Lovely❤️Love you Sweetheart❤️'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सुंदर अशी हटके कॉमेन्टस केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ब्ल्यू-रेड वाले हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास १५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. सायली सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT