नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या गांधी स्मृती आणि दर्शन समितीने (जीएसडीएस) आपल्या मासिकात विनायक दामोदर सावरकर यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी केली आहे. जून २०२२चा अंकसावरकर यांना समर्पित करण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे योगदान हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा कमी नाही. स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासामध्ये सावरकर यांना योग्य स्थानदेण्यात आले नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
गांधी स्मृति आणि दर्शन समिती (जीएसडीएस) सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.'जीएसडीएस'चे उपाध्यक्ष आणि भाजप नेता विजय गोयल यांनी 'गांधी दर्शन अंतिम जन' मासिकेत सावरकर 'महान देशभक्त' या प्रस्तावनेत म्हटलं आहे की, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात एक दिवसही तुरुंगवास भोगला नाही. ज्यांचे समाजासाठी काहीच योगदान नाही. असे लोक सावरकरांसारख्या देशभक्तांवर टीका करत आहेत. सावरकर यांचे इतिहासातील स्थान आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान हे महात्मा गांधींपेक्षा कमी नाही. सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची इतिहासात योग्य दखल घेतली नाही. हे दुर्दैवी आहे, अशी खंतही गोयल यांनी या प्रस्तावनेत व्यक्त केले आहे.
१९८४ मध्ये स्थापन झालेल्या 'जीएसडीएस'चा मुख्य उद्देश हा महात्मा गांधी यांचे जीवन, त्यांच्या विचाराचा प्रसार हा विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या करणे हा आहे. 'गांधी दर्शन अंतिम जन' या जूनच्या मासिकाचे मुखपृष्ठावर सावरकरांचे चित्र वापरण्यात आले आहे. ६८ पानांच्या या अंकात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मराठी नाटक आणि चित्रपट लेखक श्रीरंग गोडबोले, राजकीय विश्लेषक उमेश चतुर्वैदी आणि लेखक कन्हैया त्रिपाठीसह अनेक लेखकांचे हिंदुत्व विचारावर लेख आहेत. या मासिकात हिंदुत्वावर सावकरांच्या पुस्तकातील एक लेखाची समावेश आहे.
सावरकर हा एक विचार आहे, असे अटल बिहारी वाजपेयी यांच्या निंबधामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सावरकर यांनी गांधींच्या पूर्वीच हरिजन समुदायातील लोकांच्या प्रगतीची चर्चा केली होती. या मासिकामध्ये मराठी नाटक आणि चित्रपट लेखक श्रीरंग गोडबोले यांचा गांधी हत्या खटला आणि सावरकर यासंदर्भात लेख आहे. तर लेखक मधुसूदन चेरेक यांनी गांधी आणि सावरकर यांच्यातील संबंधांवर आपले मत मांडले आहे.
हेही वाचा :