Latest

Satyajeet Tambe Win : नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांचा मोठा विजय

अमृता चौगुले

नाशिक; पुढारी ऑनलाईन : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अखेर अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. त्या पहिल्या फेरीपासूनच सत्यजित तांबे यांच्यापेक्षा मतांनी पिछाडीवर होत्या. प्रत्येक फेरीअंती दोघांमधील तफावत आणखी वाढतच होती. सत्यजीत तांबे यांनी पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळवली. तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मते पडली. पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुबियांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Satyajeet Tambe Win)

सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होते. या पुर्वी त्यांचे वडिल सुधीर तांबे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांची मुदत संपत आली होती तर पुन्हा काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली होती आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पण, सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून फॉर्म भरला नाही व सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यावरुन काँग्रेस आणि तांबे कुंटुबियांमध्ये बिनसल्याचे समोर आले व या सर्व घडामोडींपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सत्यजीत तांबे यांनी सुद्धा कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याचे समोर आले होते. (Satyajeet Tambe Win)

काँग्रेसमधील अतंर्गत घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. तर भाजपने काँग्रेसमधील या बंडखोरीचा फायदा घेत आपला उमेदवार दिला नाही. तसेच त्यांनी जाहीररित्या सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देखील जाहीर केला नव्हता. या निवडणुकीने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळवत पदवीधर मतदारसंघात आपलाच दबदबा असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे या विजयानंतर सत्यजीत तांबे कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  • एकूण पडलेली मते : १ लाख २९ हजार ६१५
  • सत्यजीत तांबे यांना मिळालेली मते : ६८ हजार ९९९
  • शुभांगी पाटील यांना मिळालेल मते : ३९ हजार ५३४
  • सत्यजीत तांबे यांना मिळालेले मताधिक्य : २९ हजार ४६५
  • फेरीनिहाय मिळालेली मते
    सत्यजित तांबे
    1- 15,784
    2- 15,225
    3- 14,651
    4- 14,501
    5- 8,838
    शुभांगी पाटील
    1- 7,862
    2- 8,454
    3- 8,611
    4- 8,849
    5- 5,758

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT