sara ali khan 
Latest

Sara Ali Khan : कधी काळी बेढब दिसणारी सारा झालीय हॉट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : केदारनाथ चित्रपटानंतर सारा अली खानच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली आणि त्यानंतर या अभिनेत्रीने सिनेरिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही. पतौडी कुटुंबातील मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते. कधीकाळी बेढब, जाडजूड दिसणाऱ्या साराला पाहिल्यानंतर तुम्ही तोंडात बोटे घालाल. केदारनाथमध्येही तिचा ट्रान्सफॉर्मेशन दिसून आलं होतं. केदारनाथ, सिंबा यासारखे चित्रपट करून तिने प्रेक्षकांकडून वाहव्वा मिळवली होती. आताही तिने इतके सुंदर फोटो शेअर केलेत की, ते पाहून सर्वांनाच आणखी एकदा धक्का बसणार आहे.

सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. ती अनेकदा आपले स्वत:चे आणि कुटुंबातील सदस्यांसोबत फोटो शेअर करत असते. आताही तिने नवे फोटो शेअर केले आहेत. यात साराने पूर्वीपेक्षाही फिगर मेंटेन केलेली दिसते. सारा तिच्या स्टाईल आणि लूकबद्दल सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. पुन्हा एकदा सारा तिच्या हॉट लूकबद्दल सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्याचे चाहते ट्विटरवर #SaraAliKhan या नावाने ट्रेंड चालवत आहेत. काल रात्री, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच धुमाकूळ पाहायला मिळत आहे. ट्रान्सपरंट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सारा कमालीची सुंदर दिसतेय. तिचे चाहते या पोस्टवर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्रीने काळ्या रंगाचा थाई-हाय स्लिट ड्रेस सुंदरपणे कॅरी केला आहे, जो ब्रा स्टाईल टॉपसह जोडलेला आहे. साराचा हा लूक चाहत्यांसाठी मोठा सुखद धक्का दिलाय. सोशल मीडिया यूजर्स या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत.

नुकतीच सारा मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली. सारा व्यतिरिक्त ग्लॅमर जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मुंबईत झालेल्या इव्हेंटमध्ये सारा अली खान ब्लॅक कट आऊट थाय स्लिट ड्रेस घालून पोहोचली होती. ज्यामध्ये तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळाली. काळ्या कट आऊट थाय स्लिट ड्रेसमध्ये साराला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

साराने या कार्यक्रमासाठी डेव्हिड कोमा ट्यूल इन्सर्ट आणि क्रिस्टल मिडी ड्रेस घातला होता. डेव्हिड कोमाच्या या ड्रेसची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. या कार्यक्रमादरम्यान सारा कृती सेनन, वरुण धवन आणि कार्तिक आर्यनसोबत दिसली. चारही यंग स्टार्सनी एकत्र पोज देऊन त्यांच्या चाहत्यांना खूश केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT