Jawan Movie 
Latest

Jawan Movie : जवानमधील सान्या मल्होत्राचा नवा लूक, प्रेक्षकांनाही भूरळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सान्या मल्होत्राची तिच्या उत्कृष्ट कामगिरीने सतत सगळ्यांची मन जिंकत आहे. तिने आता चाहत्यांना वेड लावले आहे कारण तिने बहुप्रतीक्षित 'जवान'च्या प्रीव्ह्यूमध्ये एक मोठा धमाका केला आहे. (Jawan Movie ) सान्या प्रीव्ह्यूमध्ये दिग्गज शाहरुख खानसह स्टार-स्टडेड कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसली. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. (Jawan Movie )

सान्या मल्होत्रा कथलमधील तिच्या प्रभावी अभिनयासाठी कौतुकाचा वर्षाव करत असताना जवान प्रिव्ह्यूमध्ये तिच्या दिसण्याने तिच्या अभिनयाच्या पराक्रमाबद्दल उत्साह वाढवला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चतुराईने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तपशील न सांगता लपवून ठेवले आहे.

मनमोहक प्रिव्ह्यूमध्ये जवानाची झलक उलगडत असताना सान्या मल्होत्राने सहजतेने तिच्या उपस्थितीने पडद्यावर हुकूमत गाजवली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना तिच्या पात्रा बद्दल उत्सुकता निर्माण झाली.

जवान हा एकमेव प्रकल्प नाही ज्याने सान्याच्या प्रतिभे ने चमक दाखवली आहे. ती मेघना गुलजारच्या अत्यंत अपेक्षित चित्रपट सॅम बहादूर चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. जिथे ती प्रतिभावान विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करेल. जवान मधील शाहरुख खान आणि सॅम बहादूरमधील विकी कौशल सोबत सान्याचे सहकार्य सिनेमॅटिक ट्रीट देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT