संजय राऊत  
Latest

शिवसेनेचे नेते ‘ईडी’च्‍या टार्गेटवर : संजय राऊत यांचे उपराष्‍ट्रपतींना पत्र

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
महाराष्‍ट्रातील सरकार अस्‍थिर करण्‍यास नकार दिल्‍यानंतर सक्‍तवसुली संचालनालयाकडून ( 'ईडी' ) शिवसेनेचे नेते आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांना टार्गेट केले जात आहे. 'ईडी'सारख्‍या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्‍या हातच्‍या बाहुल्‍या बनल्‍या आहेत, अशी तक्रार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्‍या नायडू यांच्‍याकडे पत्राव्‍दारे केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रात म्‍हटलं आहे की, महाराष्‍ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्‍थिर करण्‍याचा विरोधक प्रयत्‍न करत आहेत. काही लोक माझ्‍याकडे आले होते. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील उद्‍धव ठाकरे यांचे सरकार अस्‍थिर करण्‍यास सांगितले. मध्‍यावधी निवडणुका घेण्‍यासाठी हा प्रयत्‍न सुरु होता;पण मी याला नकार दिला. यावेळी त्‍यांनी मला इशारा दिला की, राज्‍यात मध्‍यावधी निवडणूक होण्‍यासाठी मदत केली नाही तर माझी अवस्‍था माजी रेल्‍वेमत्री लालूप्रसाद यादव यांच्‍यासारखी होईल.

मला धमकी देण्‍यात आली होती की, महाराष्‍ट्रातील दोन मंत्री हे विदेशी संपत्ती नियमन कायदा 'पीएमएलए'नुसार अटक केली जाईल. माझ्‍या कुटुंबीयांकडे अलीबागमध्‍ये १७ वर्षांपूर्वी खरेदी केलेली एक एकर जमीन आहे. आता ईडी म्‍हणतं आहे की, जमीन किंमतीपेक्षा बाजारामुल्‍यांपेक्षा अधिक आहे. २०१२-१३मध्‍ये मी ज्‍यांना माझी जमीन विकली त्‍यांनाही तपास यंत्रणा जाणीवपूर्वक फोन करुन तुरुंगात पाठविण्‍याची धमकी देत आहेत.आतापर्यंत २८ जणांवर चुकीची कारवाई करण्‍यात आलेली असून, माझ्‍यावर दबाव आणत जबाब देण्‍यास सांगितल्‍याचेही राऊत यांनी पत्रात म्‍हटलं आहे.

'ईडी'ला बेनकाब करणार : संजय राऊत

ईडीसारखी तपास यंत्रणा राजकीय धन्‍याची बाहुली बनली आहे. माझ्‍या मुलीच्‍या लग्‍नातील फुलांची सजावट करण्‍यांची ईडीने चौकशी केली. त्‍यांना विचारले किती पैसे मिळाले, डेकोरेशन करणार्‍याची चौकशी करणे हे ईडीचे काम आहे का, असा सवाल करत आता मुंबईतील ईडीच्‍या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेत ईडीला बेनकाब करणार असल्‍याचा इशारा आज संजय राऊत यांनी माध्‍यमांशी बोलताना दिला. तपास यंत्रणांचा गैरवापर करुन दादागिरी कशासाठी करता? ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असेही त्‍यांनी ठणकावले.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT