Latest

 Sanjay Raut : भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून भक्कम आघाडी उभी करायला हवी – संजय राऊत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. शरद पवार यांच्याबाबत असं विधान करणं हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा अवमान आहे. त्याचबरोबर भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून भक्कम आघाडी उभी करायला हवी". असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना केले. वाचा सविस्तर बातमी. ( Sanjay Raut)

 Sanjay Raut : राजकीय कारकीर्दीचा अवमान

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती दि. २३ रोजी झाली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना म्हणाले, "शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत," त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

यावर आज माध्यमांशी बोलत असताना शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या बाबतीत असं विधान करणं बरोबर नाही. विशेषत: शरद पवार यांच्याबदद्ल असं बोलणं बरोबर नाही. पवारांच्याबाबत असं विधान करणं हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा अवमान आहे. भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून भक्कम आघाडी उभी करायला हवी." त्यानंतर ते चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकवर बोलत असताना ते असे म्हणाले की,  चिंचवड पोटनिवडणूक जागेसाठी शिवसेना  इच्छुक आहे."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT